रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यात यावे छत्रपती सेनेची मागणी,पोलीस उपनिरीक्षक पवार यांना देण्यात आले निवेदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 14 अक्टूबर 2018

रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यात यावे छत्रपती सेनेची मागणी,पोलीस उपनिरीक्षक पवार यांना देण्यात आले निवेदन.



भोकरदन प्रतिनिधी : शहरात अनेक दिवसांपासून रोडरोमिओंनी धुमाकुळ घातला आहे. बसस्थानक परिसर ,शाळा ,महाविद्यालय समोर,धार्मिक स्थळांच्या अवतीभवती व शहरातील विविध गजबजलेल्या ठिकाणी रोडरोमिओंची संख्या वाढली आहे, सध्या नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे,आशा ठिकाणी पण रोडरोमिओंची संख्या वाढली आहे.त्यामुळे शाळा ,महाविद्यालयातील मुली व नाहिलांमध्ये शहरात व परिसरात रोडरोमिओंची भीती निर्माण झाली आहे.महिला व मुलींना रस्त्याने चालतांना रोडरोमिओंच्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, तसेच शाळा व महाविद्यालया सुरू होण्याच्या अगोदर सुद्धा रस्त्याने सिगारेट ओढत बसतात व मुलींना लज्ज वाटेल असे कृत्य करतात.तसेच शहरातील विविध धार्मिक स्थळे रामेश्वर मंदिर अलापूर,साई मंदिर जयभवानी म्हाडा कॉलनी,गजानन मंदिर आशा विविध ठिकाणी मुलींना व महिलांना रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी लवकरत लवकर दामिनी पथक कार्यरत करून या रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा अशी मागणी छत्रपती सेने तर्फे पोलीस उपनिरीक्षक वैशाली पवार यांच्या मार्फत पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.निवेदनावर विकास जाधव,ईश्वर इंगळे,भूषण जाधव, मंगल गिराम, समाधान सोनवणे,दीपक नवले,विष्णू कोलते,मुयर देशमुख, तुषार सोळुंके,शुभम जाधव, स्वप्नील जाधव, ओंकार देशपांडे आदींच्या सह्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें