सेलू प्रतिनिधी
सेलू क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी व परभणी जिल्हा आट्यापाटया असोसिएशन व नूतन विद्यालय सेलू यांच्या वतीने शालेय जिल्हा आट्यापाटया .( ग्रामीण)क्रीडा स्पर्धा उद्घाटन दि 13 आँक्टोबर रोजी नूतन विद्यालय सेलू क्रीडांगण वर जिल्हा परीषद गटनेते राम नाना खराबे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घटन प्रसंगी राम नाना म्हणाले की निरोगी राहण्यासाठी निमयित मैदानावर खेळत रहावे , खेळातून व्यक्तिमत्त्वचा विकास होतो , व आपला व आपल्या शहराचे नावलौकीक करण्यासाठी प्राचीन आट्यापाटया खेळ शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश चा फायदा घ्यावा.
कार्यक्रम अध्यक्ष मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, उपमुख्याध्यापक अशोक गाजरे ,आट्यापाटया जिल्हा सचिव मधुकर क्षिरसागर, पर्यवेक्षक मा.मा.सुर्वे, गणेश माळवे, क्रीडाधिकारी प्रकाश होनवडकर, प्रंशात नाईक , आदी उपस्थित होते.
कार्यक्रम चे सुत्रसंचालन सतिश नावाडे,तर आभार प्रदर्शन किशन राठोड यांने मानले.
14/17/19 मुले/मुली व ग्रामीण गटातील 13 संघानी सहभाग नोंदवला.
14 मुले प्रथम जय जवान जय किसान वि. कावलगांव तर व्दितीय नूतन विद्यालय सेलू. मुलीत प्रथम नूतन वि. सेलू ,व्दितीय- गोकुळ नाथ वि. पिगळी,
17 मुली प्रथम : नूतन वि.सेलू व्दितीय- गोकुळ नाथ वि. पिंगळी, 17 मुले प्रथम - जय जवान जय किसान वि. कावलगाव व्दितीय: नूतन विद्यालय सेलू.
19 मुली प्रथम- गोकुळनाथ वि.पिगळी, व्दितीय: नूतन कन्या प्रशाला सेलू.19 मुले प्रथम - जय जवान जय किसान वि.कावलगाव व्दितीय - गोकुळनाथ वि. पिंगळी.
स्पर्धेस पंच म्हणून विवेक क्षिरसागर,प्रा. बी.एम.सुरासे, मोहन पिसाळ , गजानन पिसाळ , सखाराम पिसाळ, आनंदा मिरासे,बळीराम पिसाळ , यांनी काम पाहिले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें