सेलू प्रतिनिधी.
ब्राह्मण महिला विषयी व मुलींविषयी अत्यंत अश्लील व अश्लाघ्य भाषेत फेसबुक वर पोस्ट टाकणाऱ्या एका पत्रकार विरुद्ध सेलु पोलिसात गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपाधीक्षक रेणुका वागळे या करत आहेत
याबाबतचे वृत्त असे की 6 ऑक्टोंबर रोजी फेसबुक वर औरंगाबाद येथील एका वृत्तपत्र सहाय्यक वृत्तसंपादक म्हणून काम करणारा सुरेश पाटील याने फेसबुक वर ब्राह्मण समाजातील महिला व मुली विषयी अत्यंत अश्लील भाषेत पोस्ट टाकून आपल्या स्वतःच्या अकलेचे तारे तोडले होते त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात व ब्राह्मण समाजात महिला विषयी केलेल्या अत्यंत घाणेरड्या पोस्ट मुळे संतापाची भावना निर्माण झाली असून औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात त्याबाबतचे पडसाद उमटत आहेत त्याचाच एक भाग म्हणून सेलू येथील पत्रकार दिलीप डासाळकर यांनी सुरेश पाटील यांच्याविरोधात सेलू पोलिसात गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी या करत आहेत दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की एका मोठ्या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करणाऱ्या पत्रकाराकडून आशा अपेक्षा नसून पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ आहे त्यामुळे पत्रकाराने प्रत्येक गोष्ट अतिशय काळजीपूर्वक लिहिली पाहिजे परंतु या पत्रकाराने कुठलीही लाज शरम न बाळगता मुली व महिला विषयी विकृतीचे निवेदन पोस्ट केल्यामुळे त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा तसेच वृत्तपत्र सारख्या पवित्र क्षेत्रातून त्याची हकालपट्टी करावी अशी मागणी संपूर्ण ब्राह्मण समाजातून होत असून या निवेदनासोबत खेद व्यक्त करण्यात येत असून सेलू पोलिसात त्याचे विरुद्ध कलम 295 ये, 509, 67 ए, गुरणं 250/ 18 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें