सेलू प्रतिनिधी.शमशेर खान.
गौरव सेवाभावी संस्था द्वारा संचलित यासेर उर्दू शाळा सेलु येथे आज गोवर आणि रूबेला रोगाच्या संदर्भात करण्यात येणाऱ्या लसिकरण संदर्भात पालक मेळावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा न.प. सदस्य रहीम खान खैरुल्ला खान पठाण हे तर प्रमुख अतिथि म्हणून डॉक्टर रुबी या होत्या.
यावेळी उपस्थित असलेल्या पालकांना डॉ.रुबी यांनी विस्ताराने गोवर आणि रूबेला च्या संदर्भात करण्यात येणाऱ्या लसिकरण संदर्भात विस्ताराने माहिती दिली.
यावेळी गोवर रूबेला संदर्भात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिश वितरित करण्यात आले. शिवाय 18 वर्षा खलील क्रिकेट स्पर्धेत शालेचा संघ सेमी फाईनल पर्यंत पोहोचला त्यामुळे क्रीड़ा शिक्षक ज़हीर अंसारी यांचा सत्कार करण्यात आला.
त्याशिवाय नवनीत मास्टर स्ट्रोक चे पुरस्कार जोया खानम निसार अहेमद खान व इतर विद्यार्थी नि ना देखील बक्षिसे वितरित करण्यात आले. कला शिक्षक सय्यद अमन यांचा देखील सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापके पठाण जावेद खान फिरोज खान माध्यमिक च्या मुख्याध्यापिका कासमी टि.एस, सय्यद ईमरान, सय्यद अज़ीम, सय्यद खिजर आदींनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें