सिल्लोड प्रतिनिधी,:
सिल्लोड 6 ऑक्टोबर : नॅशनल मराठी विद्यालय सिल्लोड येथे जागतिक वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी वन्यजीव व त्यांच्या माहितीचे भित्तिचित्रे तयार केली .या कार्यक्रमाचे उद्घाटन नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी श्री रईस खान यांनी केले. उद्घाटन प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रमोद सोळुंके , नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा अब्दलशहा नगरचे मुख्याध्यापक श्री. शोएब सर तसेच नॅशनल उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. वहीद सर उपस्थित होते . वन्यजीवांच्या चित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे महत्त्व कळले व लुप्त होत चाललेल्या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काय उपाय योजना करता येईल याचा संदेश त्यांना मिळाला. याप्रसंगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती त्रिशला काकडे, राजू काकडे, गणेश पालोदकर , कैलास बनकर, ज्ञानेश्वर पवार, प्रदीप नेमाडे, फिरोज मिर्झा,अशोक शिंदे,शेख मूनाफ,संदीप साळवे,आजिनाथ सुरडकर,काशिनाथ फरकाडे,शेख जफर, इरफान खान,इसरार पठाण, शाम सोनवणे ,रमेश शिंदे,गजानन माळी, उषा ढोके कल्पना गोंगे , विद्या गोंगे, प्रतिभा कदम , रुखमन सपकाळ , मनीषा गव्हाणे मंजुषा परदेशी , सेवक शेख इब्राहिम, शेख इर्शाद, दीपक कल्याणकर आदींसह विद्यार्थी, परिसरातील नागरिक व पालकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें