शेतात सोयाबीन काढणीच्या वादातुन एकाचा खून.बाप लेक ताब्यात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 6 अक्टूबर 2018

शेतात सोयाबीन काढणीच्या वादातुन एकाचा खून.बाप लेक ताब्यात.


 सोनपेठ प्रतिनिधी ः
दि.५ सोनपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गौंडगाव ता. गंगाखेड येथे  सोयाबीन काढणीच्या वादातून एकाचा खून झाला असुन या प्रकरणात पोलीसांनी बाप लेकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.


गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव येथील  गोपीनाथ जाधव यांनी पेरलेले सोयाबीन भागवत दत्ता भारती हा काढीत असल्याचे पाहुन गोपीनाथ जाधव यांनी त्यास सोयाबीन काढण्या बाबत जाब विचारला असता भागवत भारती याचां त्यांच्या सोबत वाद झाल्याने या झटापटीत गोपीनाथ जाधव यांनी भागवत भारती यांच्या वर दगडाने व लोखंडी गजाने वार केले यात भागवत भारती गंभीर जखमी झाल्याने त्यास त्याच्या नातेवाईक यांनी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला.दरम्यान भागवत भारती याच्या हल्ल्यात जखमी झालेले गोपीनाथ जाधव हे आपल्या मुला सोबत  सोनपेठ येथील रुग्णालयात उपचारासाठी आले असल्याची माहितीदरम्यान सोनपेठ पोलिसांना  मिळताच पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असुन पोलीस त्याची  चौकशी करत आहेत याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सोपान शिरसाट स.पो.नि.अमोल पवार हे करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें