२४७ विद्यार्थ्यानी नोंदाविला सहभाग.
सेलू प्रतिनिधी
सेलू:- येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ विद्यालयात संस्थेचे मार्गदर्शक तथा प्रेरणास्थान डॉ. रामरावजी रोडगे भाऊ यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्य आंतरशालेय रंगभरण स्पर्धेचे आयोजन (ता.१३) वार शनिवार रोजी विद्यालयात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे , स्पर्धेचे उद्घाटक डॉ. रामरावजी रोडगे , प्रमुख पाहुणे बाबुराव सूर्यवंशी, शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके, माध्यमिक उत्कर्ष विद्यालायाचे मुख्याध्यापक दगडोबा माने व बालवाडी विभाग प्रमुख अपर्णा काकडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
आंतरशालेय रंगभरण स्पर्धेत नूतन प्राथमिक, नूतन इंग्लिश स्कूल, न्यू मॉंडन इंग्लिश स्कूल, क्युरिअस किड्स , प्रिन्स इंग्लिश स्कूल, प्रिन्स अकॅडमी, ज्ञानतीर्थ विद्यालय आदी शाळेतील नर्सरी, जुनियर के जी, सिनियर के.जी.व इ.१ ली तील असे एकूण २४७ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदाविला होता.
आपल्या मनोगतामध्ये डॉ. रोडगे यांनी असे म्हंटले कि, लहान वयातच विद्यार्थ्याच्या अंगी एक कला अवगत असते. याच कलेला ओळखून त्याचा मानसिक, बौधीक, शारीरिक व शैक्षणिक विकास होत असतो. लहान वयातच मुलांच्या कल्पना शक्तीस वाव मिळत असतो. ज्या विध्यार्थ्यानी सहभाग नोदाविला त्या विध्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ.कालिंदा पवार, सौ. वंदना अरकुले, सौ.प्रतिभा कडभाने, सौ. वैशाली साबळे, सौ.रोहिणी घाटूळ आदीनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें