जिंतुर / प्रतिनिधी.
जिंतुर तालुक्यातील चारठाणा येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या ४ कोटी १३ लक्ष रु च्या कामाचे भूमिपूजन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. बबनराव लोणीकर यांच्या हस्ते गुरूवार ४ रोजी शुभारंभ करण्यात आला.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून ना लोणीकर यांनी जिंतुर तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या टप्पा क्रमांक ०१ च्या आराखड्यात तालुल्यातील मौजे वर्णा, वडाळी, बामणी, असोला, लिंबाळा, भोगाव, चारठाणा या गावांचा समावेश करून सदरील गावांना ८ कोटी ५४ लक्ष रु चा निधी मंजुर करून दिला होता त्याच बरोबर राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये तालुक्यातील मौजे केहाळ, केहाळ तांडा, धानोरा बु., बोरगळवाडी, वडी, सांगळेवाडी, रेपा, पुंगळा तांडा, नांदगाव दु., मालेगाव दु., गारखेडा, पिंपळगाव गायके, शेवडी अंतर्गत येणोली तांडा, तेलवाडी, चितणरवाडी, मांडवा या गावांना मंजुरी देण्यात आली आहे.
तसेच मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी ना. लोणीकर यांनी विशेष लक्ष घातले आहे.. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.विजय भांबळे, हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आधिकारी पि.शिवाशंकर, हभप नामदेव महाराज ढवळे, हभप बाबासाहेब महाराज इंगळे,जि.प.आध्यक्षा उज्वला ताई राठोड, उपा अध्यक्ष भावनाताई नखाते, गणेशराव रोकडे, लक्ष्मण इंलग, खडेराव अघाव, राजेश वटमवार, प्रसाद बुंधवत ,राजेंद्र लाहने मिनाताई राऊत, तहसीलदार सुरेश शेजुळ, उमाकांत पारधे, सुरेश नागरे, नानासाहेब राऊत ,इदुबाई भवाळे यांच्या सह आदीची या वेळी उपस्थिती होती होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच बि.जी. चव्हाण, तैसीन देशमुख, विष्णू वानखरे सय्यद इम्रान,सय्यद दाऊत, बाबासाहेब म्हेत्रे,आदींनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें