शेख सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : शहरातील म्हाडा कॉलनी रस्त्यावरील प्रभात इंग्लिश स्कूल मध्ये दिनांक 2 अक्टोबंर मंगळवार रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष राहुल भैय्या देशमुख व ज्ञानेश्वर काळे यांच्या हस्ते या दोन्ही महापुरुषाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका आचर्ना मगर यांनी उपस्थितींना राष्ट्र पिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री या दोन्ही ही महापुरुषाच्या जिवन पटावर प्रकाश टाकला. झालेल्या कार्यक्रमाला प्रभात अर्बन बँकेचे मॅनेजर सचिन मगर, मोठेबा जाधव, सुरेश सुरडकर, तसेच शाळेच्या सहशिक्षिका जिजा
वरपे मॅडम, स्वाती शिंदे , प्रियांका क्षीरसागर , मनिषा साबळे , कविता गुंजाळ, ज्योती घोरपडे, गजानन निकाळजे , किरण आरके , प्रमोद गोफने , गणेश शेटे यांच्या सह सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें