जिंतूर न.प.च्या इमारती वरून एका नामांतर त्रस्त नागरिकाची उडी मारण्याचा प्रयत्न_
जिंतर : जिंतूर नगरपालिकेत गेल्या अनेक महिन्यांपासून नागरीकांचे कामे होत नसल्याने आज संयुक्त नगरसेवकांनी नगरपालिकेच्या मुख्य व्दार वगळता सर्व विभागांना कुलूप ठोकले. नागरिकांचे कामे होत नसल्याने शहरामध्ये सर्वच कामांचा खोळंबा झाला असून, जनतेच्या प्रश्नांना वैतागून काँग्रेस व सत्ताधारी राष्ट्रवादी च्या नगरसेवकांनी गुरूवारी दुपारी 12 च्या सुमारास कुलूप ठोकले. जिंतर नगरपालिकेत पंचवीस ते तिस वर्षा नंतर नागरिकांनी सत्ता परिवर्तन केले होते.पन आताहि नागरिक कामे होत नसल्याने परेशान आहे. शहरात हि नगरपालिका एक तर्फा विकास करत असुन शहरातील नदिवरील विकासकामे खंडित आहे. गेल्या तीन महिन्यापासून नागरिकांच्या प्लॉट चे नामांतर होत नसल्याने आज त्रस्त नगरसेवक व नागरीकांनी न.प.च्या कारभार विरोधात आपला रोष व्यक्त केला.
नगरसेवकांच्या या भुमीकेमुळे नप च्या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालय बाहेर परिसरात बसावे लागले.
आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जिंतूर नप च्या काही नगरसेवकांनी नप कार्यालयाकडुन जनतेची कामे होत नसल्याने जिंतूर नप ला कुलूप ठोकले आहे..!


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें