सेलू येथे मुस्लिम युवक परिवर्तन परिषद संपन्न . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 8 अक्टूबर 2018

सेलू येथे मुस्लिम युवक परिवर्तन परिषद संपन्न .



सेलू प्रतिनिधी.
सेलू येथील मुस्लिम समाजाची सामाजिक, शैक्षणिक, अर्थिक , राजकीय, सांस्कृतिक दशा व दिशा या बाबींवर चर्चा करण्यासाठी मुस्लिम युवक परिवर्तन समिती सेलूच्या वतिने रविवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी आठवडी बाजार येथे मुस्लिम युवक परिवर्तन परिषदचे अयोजन शेख म. अय्युब यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जमीयत ए उलेमा हिंदचे मराठवाडा सचिव मौलाना जलील, गौस झैन, फेरोज अली यांनी मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाची प्रस्तावना शेख महेमुद सर यांनी केले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन नगरसेवक शेख रहीम,  अजिम कादरी, माजी नगरसेवक मजिद बागवान, मनसेचे जिल्हाअध्यक्ष शेख राज, आम आदमी पार्टिचे युवा अघाडी जिल्हाध्यक्ष शेख शकील, ईसाक पटेल, हाजी अकरम अदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संयोजन समितीचे करीम खॉन, मुताहेर खॉन, शाहेद लाला,  जमीर सारवान, सय्याद दिलावर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले सुत्रसंचालन शेख म. हारुण यांनी तर अभार प्रदर्शन शेख शमशोद्दिन याांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें