बदनापुर प्रतिनिधी :
सध्या जालना जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असुन शेतकऱ्यांचे संपूर्ण पिक वाया गेलेले आहेत त्यामुळे जालना जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करण्यात यावे जिल्ह्यात पावसाने अत्यंत कमी झाल्याने शेतकऱ्यांचे फळबाग, कापूस, तुर, उडीद, मुग,सोयाबीन, हे सर्व पिके पाण्याअभावी वाया गेले असुन या पिकावर शेतकरी आपल्या मुला मुलीचे लग्न मुल्याचे शिक्षण कुटुंबाचा उदरनिर्वाह व शेतीच्या खर्च भागवतो परतु पाउस नसल्यामुळे हे सर्व पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांपुढे जीवन जगण्याच्या मोठे आव्हान उभे आहे यातुन शेतकऱ्यांना शासनाने बाहेर काढून फळबागांना एकरी २ लाख व इतर मालाला एकरी १ लाख रुपये मदत करावी जेणेकरुन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही तसेंच जालना जिल्ह्यामध्ये द्राक्ष फळबागांचे मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे या सर्व फळबागचा पिकविमा भरून शेतकऱ्यांना त्यांच्या लाभ देण्यात यावा
जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा नसता भारिप बहुजन महासंघ मोठ्या प्रमाणात आदोलन करेल आणि होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार राहील याची दखल प्रशासनाने ध्यावी
यावेळी शेलेद्र मिसाळ सरपंच भाकरवाडी,भारत रगडे तालुका कार्याध्यक्ष, आकाश ससोने,विक्की साबळे,रविराज, विनोद मगरे, यांच्या सह महासंघ चे पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें