वरपूडकर महाविद्यालयाचे क्रीडास्पर्धेत यश.ऊमेश मुळे याने पटकावले सुवर्ण पदक. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 4 अक्टूबर 2018

वरपूडकर महाविद्यालयाचे क्रीडास्पर्धेत यश.ऊमेश मुळे याने पटकावले सुवर्ण पदक.



सोनपेठ(राजेश खेडकर) दि.०४ऑक्टोबर २०१८
येथील कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयाची क्रीडा स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम आहे. नुकत्याच स्वारातीमवि नांदेडच्या वतीने केकेएम महाविद्यालय मानवत येथे झालेल्या सेंटर झोन खो-खो स्पर्धेत 'ड' झोन च्या संघाने विजय प्राप्त केला. या संघात महाविद्यालयाचा खेळाडू विद्यार्थी ऊमेश नागोराव मुळे यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आज संस्थाध्यक्ष परमेश्वर कदम, प्राचार्य डाॅ.वसंत सातपुते व क्रीडा संचालक प्रा.गोविंद वाकणकर यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सखाराम कदम यांनी तर आभार डाॅ.संतोष रणखांब यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें