कृषिविभाग भोकरदन येथे शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 16 अक्टूबर 2018

कृषिविभाग भोकरदन येथे शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन.

संतत्प शेतकऱ्यांनी कार्यालयावर फेकली पीके. दुष्काळाची तीव्रता वाढत असतांना सुद्धा जबाबदार अधिकारी  यांनी शेतकऱ्यांकडे फिरवली पाठ.


मागण्या मान्य न झाल्यास छेडणार तीव्र आंदोलन.


शेख सलिम

भोकरदन प्रतिनिधी-

     सध्या तालुक्यातील सर्व भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरलेला आहे आणि पाण्याअभावी पीक हे पूर्णपने वाया गेलेले गेलेले आहे अश्या शेतकऱ्यांच्या बांधावर येउन पंचनामे करावे व पीकविमा त्वरित मंजूर करावा ,मागील वर्षीच्या प्रधानमंत्री पीक विमा योजने पासून वंचीत असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा,भोकरदन तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा,जे शेतकरी कर्जमुक्ती पासून वंचित आहे अश्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ देऊन त्वरित पीककर्ज देण्याची मागणी मागणी भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील पवनपुत्र सेवाभावी संस्थेने कृषिअधिकारी डी बी व्यवहारे यांच्याकडे केली होती तसेच आंदोलनाचा इशारा दिलेल्या निवेदनात देण्यात आला होता.भोकरदन तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी कपाशी,मका,तूर,उडीद,मुंग,
सोयाबीन, भुईमुंग, बाजरी इत्यादी पिकांचा पीकविमा भरलेला आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे,वादळी वाऱ्यासह होणारा पाऊस,नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना सरकारने शेतकऱ्याच्या पिकांना संरक्षण मिळावे म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केलेली आहे.त्यामुळे पिकांचे पंचनामे करून पीक विमा मंजूर करण्याची मागणी 9 सप्टेंबर रोजी  संस्थेच्या वतीने दिलेल्या निवेदनात करण्यात आली होती.       यावर संबधित विभागाने कुठलीही सकारात्मक कार्यवाही केली नसल्याने शेतकऱ्यांनी कृषिविभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन  केले.तसेच वरिष्ठ अधिकारी आंदोलनाकडे फिरकले नसल्याने
संतप्त शेतकऱ्यांनी कृषिविभाग प्रवेश दारावर कपाशी,तूर हे पीके फेकून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर कृषिसहायक पी.ए.पाबळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.कृषिविभागाला दिलेल्या निवेदनात येत्या पंधरवाड्यात जर मागण्या मान्य केल्या नाही तर शेतकऱ्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या निवेदनावर अनिल भुतेकर,संदीप भोकरे,नारायण लोखंडे,शिवाजी इंगळे,अमोल लोखंडे,अर्जुन खांडवे,समाधान लोखंडे,भानुदास लोखंडे,राहुल देवरे,गणेश सोळुंके,प्रविण साबळे,अमोल साबळे,विवेक जाधव,,दिपक जाधव,किरण सहाणे,अमोल जाधव  आदींच्या सह्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें