तरुणास मारहाण प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 17 अक्टूबर 2018

तरुणास मारहाण प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल.



सेलू प्रतिनिधी.
सेलू पाथरी रस्त्यावर एका जिनिंग च्या समोर तरुणास पाच जणांनी बेदम मारहाण केली असून त्यांच्या जवळ असलेली रोख रक्कम व सोने घेऊन तरुण पसार झाले या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबतची माहिती या प्रमाणे सेलू पाथरी रस्त्यावर एका जिनिंग समोर घटनेच्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता सुनील गुलाबराव मोगल वय 28 या तरुणास शेखर कथले , किरण डोळेझापे , भीमा टाके, योगेश ढवळे, बजरंग मोगल यांनी काठ्यांसह घातक शस्त्राने बेदम मारहाण केली या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुनील मोगल यांच्या जवळ असलेले रोख वीस हजार रुपये, दोन तोळे सोन्याची चैन, घेऊन आरोपी पसार झाले ही घटना 12 ऑक्टोंबर रोजी घडली असली तरी फिर्यादी हा गंभीर जखमी असून शुद्धीवर नसल्यामुळे यासंदर्भात संबंधितावर 15 ऑक्टोंबर रोजी  गुरंण 260 नुसार भा द वि 326, 327 ,341, 323, 143, 147 ,148 ,149, 504 ,506 मुंबई पोलीस अॅक्ट 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख मुजीब , सातपुते, बाळू कदम हे करत आहेत उभयतात मधील भांडणाचे कारण मात्र समजू शकले नाही.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें