जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल - डिझेल व गॅस दरवाढीचा निषेध; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 11 अक्टूबर 2018

जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल - डिझेल व गॅस दरवाढीचा निषेध;

तहसील कार्यालयास निवेदन सादर ;


सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.११ )
अंतरराष्ट्रीय स्थरावर कच्चा तेलाच्या बॅरलचे दर भाजपाच्या राजवटीत अत्यंत कमी झालेले असतांना मात्र पेट्रोल व डिझेलचे दर आकाशाला भिडत आहेत. दिवसेंदिवस पेट्रोल - डिझेल व गॅसची दरवाढ करून सर्वसामान्यांना संकटाच्या खाईत लोटणा-या बेजबाबदार व निष्क्रीय केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला. दरवाढ तातडीने रद्द करावी दरवाढ कमी न झाल्यास युवक काँग्रेस लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा निवेदनाद्वारे तहसिल कार्यालय सिल्लोड यांना देण्यात आला.

सिल्लोड शहरातील भराडी चौक येथील पेट्रोल पंपावर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वात पेट्रोल - डिझेल व गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करीत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना भाजपा सरकारच्या जनविरोधी धोरणांबाबत अवगत केले. जनविरोधी व भूलथापा मारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला काळे फासून सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला. तसेच पेट्रोल- डिझेल भरायला येणा- यांना चाॅकलेट वाटप करून गांधीगिरी देखील करण्यात आली .

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कमी असतांना देखील भारतात पेट्रोल - डिझेल व गॅस चे दर कमी होण्यास तयार नाहीत. भाजप सरकार सामान्य जनतेला वेठीस धरुन शासन काही निवडक लोकांचे खिसे भरण्याचे काम करीत आहे. केंद्र व राज्य शासनाने इतर वस्तू व उत्पादनांसाठी जीएसटी कायदा लागू केला तसाच पेट्रोल - डिझेल व गॅस वर का केला नाही? जीएसटी कायदा लागू करुन आकारात असलेले इतर उपकर रद्द केल्यास भाव कमी होतील व सर्वसामान्यांना दिलासा मिळेल भविष्यात दरवाढ व महागाई थांबली नाही तर युवक काँग्रेसच्या वतीने लोकशाही मार्गाने तीर्व आंदोलन छेडेल असा इशाराही युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते निवेदनाद्वारे देण्यात आला.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात युवकांनी पेट्रोल - डिझेल व गॅस दरवाढीविरोधात निषेध व्यक्त करीत भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, युवक काँग्रेसचे प्रदेशसचिव रुपेश जैस्वाल, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, सलिम हुसैन, विठ्ठलराव सपकाळ, राजुमिया देशमुख, नगरसेवक रईस मुजावर पठाण, संजय मुरकुटे, शेख बाबर बागवान, सुनिल दुधे, सत्तार हुसैन, राजरत्न निकम, अकिल देशमुख, संजय आरके, मनोज झंवर, मतीन देशमुख, सतीष ताठे, डाँ.फेरोज खान, संजय फरकाडे,गणेश डकले, जमीर मुल्तानी, मधुकरराव बेंडाळे, हनिफ मुल्तानी, शिवाआप्पा नगरे, राजू बागवान, गुलाबराव मिरगे, अब्दुल बासित, राधेश्याम अग्रवाल, मनोहर आरके, गणेश राजपूत, एकनाथ शिंदे, फईम पठाण, रवि आरके आदिंसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल - डिझेल व गॅस दरवाढीचा निषेध करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेस काळे फासल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांवर सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें