सेलु शहरात तापाच्या साथीचे थैमान रुग्णांची संख्या वाढली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 1 अक्टूबर 2018

सेलु शहरात तापाच्या साथीचे थैमान रुग्णांची संख्या वाढली.



सेलू प्रतिनिधी.शमशेर खान.
सेलू वातावरणातअचानक झालेल्या बदलामुळेशहरात व परिसरात विषाणुजन्य तापाने अनेक रुग्ण फणफणले असून. शासकीय व खासगी
रुग्णालयात रुग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाड झाली आहे. आरोग्य
विभागाकडून मात्र याबाबत कोणत्याही
प्रकारची दखल घेतली गेली नसून
नागरिकना आवाहन करण्यात आलेले नाही.
काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला. कधी थंडी चे तर कधी उष्णतेचे आणि डगाळ दमट वातावरण
तयार झाल्याने नागरिकाच्या प्रकृतीत बिघाड झाली आहे कधी दमट वातावरणामुळे विखशूनी संख्या वाडून नागरिकांना तसेच लहान
बालकांनादेखील ही थंडी वाजून ताप, सर्दी व खोकला या आजारांची लागण झाली आहे. एकाच कुटुंबातील अनेकसदस्यांना
तापाची साथ लागत असल्याने नागरिकात
प्रचंड भीतीचे वातावरण पसरून त्यांनी डेंग्यूसदृश आजाराची भीतीची धसकी घेतली आहे. उपजिल्हा रुग्णालय व तसेच शहरातील सर्वच खाजगी रूग्णालयातया रोगांवर उपचार करण्यासाठी गर्दी होत असून सर्वाची रक्त तपासणी करणे गरजेचे
ठरत आहे. त्यामुळे सर्व लॅम्प मध्ये देखील रक्त तपासणीसाठी रुग्णांना रंगा लावाव्या लागत
आहेत. तसेच सेलू शहरासह ग्रामीण भागातही या तापाच्या आजाराने थैमान घातले असून,
नागरिक मोठ्या प्रमाणात शहरातील कोणत्याही रुग्णालयात धाव घेत आहेत. झपाट्याने पेशी कमी होण्याचे प्रमाण रुग्णांमध्ये आढळून येत असल्याने नागरिकांत डैहेग्युसदृश रोगाची भीती निर्माण झालीआहे. या बदललेल्या वातावरणात सर्वाधिक फटका लहान बालकना बसल्याचे दिसून येत आहे. तरी आरोग्य विभागाने याबाबत योग्य ती दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी जनतेतून होत   आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें