अज्ञाताने पळविले महिलेच्या गळ्यातील गंठण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 5 अक्टूबर 2018

अज्ञाताने पळविले महिलेच्या गळ्यातील गंठण.



सेलू प्रतिनिधी

एका महिलेच्या गळ्यातील 44 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात इसमाने पळविल्याची घटना 4 ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजता  शहरातील नंदनवन कॉलनीत घडली याबाबतची माहिती या प्रमाणे शहरातील नंदनवन कॉलनी  मधील रहिवासी महिला मनीषा विजयकुमार घुगे यांच्या गळ्यातील 44 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण एका अज्ञात इसमाने दुचाकीवरून पळून नेल्याची घटना गुरुवार 4 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजता घडली सदर महिलेच्या गळ्यातील गंठण अज्ञात इसमाने हिसकावून दुचाकीवरून पलायन केले परिसरात अनेक जण महिलेने ओरड केल्यामुळे अज्ञात इसमाचा मागे लागले परंतु त्यास पकडण्यात अपयश आले याप्रकरणी मनीषा घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भा द वि 392 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ नितीन काशीकर हे करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें