सेलूत अखेर पोलिसांचे चिडीमार पथक सक्रिय,अनेक रोड रोमिओर केली कारवाई कोणाचीही गय केली जाणार नाही. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 5 अक्टूबर 2018

सेलूत अखेर पोलिसांचे चिडीमार पथक सक्रिय,अनेक रोड रोमिओर केली कारवाई कोणाचीही गय केली जाणार नाही.



सेलू प्रतिनिधी शमशेर खान.दि.05/10/2018.
सेलु शहरात मागील कित्येक दिवसापासुन रोडरोमिओ यांनी शहरातील विद्यालय, महाविद्यालय, तसेच कोचिंग क्लासेस, बसस्थानक आदि ठिकाणी घुमाकुळ घातला होता. चक मुलींना रस्त्यावर येऊन बंदोबस्त करण्याची वेळ आली आणि त्यांनी तर निभडपणे।रोडरोमिओस वेदम चोप दिला. त्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आणि बंद पडलेले विीमार पथक बुधवारी कारवाईच्या माध्यमातून सक्रीय झाल्याचे दिसून आले शहरातील नुतन महाविद्यालय परिसरात अनेक रोडरोमिओ या चिडीमार पथकाच्या हाती लागलेत्यात यातील काही
रोडरोमिओचा तर महाविद्यालय व शिक्षणाचा कुठलाही संबंध नसल्याचे
चौकशीत स्पष्ट झाले. त्यांच्यावर ११0,११७ मुंबई ऑक्टप्रमाणे कारवाई
करण्यात आल्याची महिती पोलिसांनी दिली. या कारवाईमुळे पालक व मुली यांचात समाधान व्यक्त होतांनाच पोलिसांचे कंतुकही केले जात आहे तसेच ही कारवाईअशीच कायम रहावी तसेच काही दिवसासाठीच हे पथकाची नियुक्ती न करता कायमस्वरूपी नियुक्तीची मागणी होतआहे. या कारवाईमुळे मात्र रोडरोमिओ चांगलेच धाबे दणाणले आहे. तसेच
शाळकरी मुलींचा आत्मविश्वास वाढला
की. पोलिसही आता रोडरोमिऑवर लक्षठेवुन आहेत. मात्र या रोडरोमिओंना पाहण्यासाठी व सोडविण्यासाठी
युध्दपातळीवर काही जण प्रयत्न करत असल्याची चर्चा गावभर फिरू लागली.आज पोलिसांची भूमिका ठाम असल्यामुळे
कुणाचीही गय केलीजाणार नाही याभूमिकेत पोलिस प्रशासन आहे. पोलिस
निरीक्षक सांदिपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चिडीमार पथकाचे प्रमुख
डॉ नितीन काशीकर, पोलिस कर्मचारी रामेश्वर मुठे व महिला पोलिस कर्मचारी सारिका कड यांनी ही कारवाई केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें