मानवत/ मुस्तखीम बेलदार.
दि.१४: सर्व शिक्षा अभियान मार्फत प्रकाशित केलेले समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकातील राजे संभाजी महाराज यांच्याबद्दल चरित्र हरण करणारा मजकूर प्रकाशित करून बदनामी केल्याप्रकरणी संबंधितावर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन आज दि.१४ अॉकटोबर रोजी मानवत येथील आंबेडकरवाद विचार युवा मंचच्या वतीने पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मानवत यांना देण्यात आला आहे .
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की बुद्धभूषण निर्माते संभाजी महाराज यांच्याबद्दल समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात आलेला आक्षेपार्ह मजकूर ज्यामुळे सर्व बहुजन समाजाच्या भावना दुखावले आहेत ज्यामधून आमचे आदर्श छत्रपती संभाजी राजे चे चरित्र सार्वजनिक पणे कलुषित केले आहे ज्यामुळे महाराष्ट्र मध्ये जातीय तणाव वाढविण्याचा काही समाजकंटकांचा हेतू आहे यामध्ये समाविष्ट असणाऱ्या लेखिका शोभा साठे व प्रकाशक संध्या चंद्रकांत लाखे यांच्याविरुद्ध व संबंधित प्रकरणात अप्रत्यक्षपणे सहभागी असणारे सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी या पुस्तकात उतरण्यासाठी आदेश दिला या सर्व गैरअर्जदारावर भा द वि कलम २९५व २९८ १९५ १२० ब १५३ १४७ १४८ १४९ व ३४ अन्वये तथा साहित्य प्रकाशन कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात यावा असे नमुद केले आहे. निवेदनावर आंबेडकर वाद विचार युवा मंच चे विजय खरात, शुभांग पंचांगे, मेघनंद भाले, विजय धबडगे, किरण पंडित, रतन ढवळे, राजेश महिपाल ,सावन जोंधळे, विकी नितनवरे, प्रतिपाल भदर्गे आदिच्या स्वाक्षरी आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें