सेलूत 18 सज्जाच्या तलाठ्यांचे 9 कार्यालयाला सील.उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांची कारवाई. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 4 अक्टूबर 2018

सेलूत 18 सज्जाच्या तलाठ्यांचे 9 कार्यालयाला सील.उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांची कारवाई.



सेलू प्रतिनिधी शमशेर खान

तालुक्‍यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तलाठी कार्यालय ही त्या त्या सज्जावरच ठेवण्यात आली नसल्यामुळे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी बुधवार तीन ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजता शहरात असलेल्या तलाठ्यांच्या कार्यालयाची अचानक पाहणी करून 18 सज्जांच्या तलाठ्यांचे 9 कार्यालय सील केल्यामुळे  तलाठ्यासह महसूलच्या कर्मचाऱ्यात खळबळ निर्माण झाली आहे याबाबतची माहिती या प्रमाणे सेलू तालुक्यात एकूण 95 गाव असून 29 सज्जे आहेत  24 तलाठी यावर काम करतात
उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी सेलूला रुजू झाल्यानंतर त्यांनी महसूल प्रशासनाला शिस्त लागावी म्हणून अनेक उपक्रम हाती घेतले आहेत .ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध कामासाठी लागणाऱ्या सातबारा ह्या गावातच मिळाव्या अशी भूमिका उपविभागीय अधिकारी पारधी यांची आहे. तशा प्रकारच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या होत्या परंतु तलाठी हे  कार्यालय मात्र सज्जात न्यायचे नाव घेत नव्हते. या प्रकरामुळे सज्जात कार्यालय स्थलांतरित न करणाऱ्या तलाठ्यांचे कार्यालय सील करण्यात  आले बुधवारी घटनेच्या दिवशी दुपारी तीन वाजता उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी स्टेशन रस्त्यावर तीन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या 18 सज्जांच्या नऊ तलाठी कार्यालयाला सील लावले हा प्रकार कळताच उपस्थित तलाठी चांगलेच हादरले असून महसूल प्रशासनात यामुळे खळबळ उडाली आहे

सज्जात कार्यालय स्थलांतरित न केल्यामुळे कारवाई

शेतकऱ्यांच्या सातबारा सज्जा वरच मिळाली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका सूचना देऊन ही संबंधित सज्जाच्या तलाठ्यांना दिली होती. परंतु तरीही तलाठी कार्यालय सज्जावर स्थलांतरित न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची प्रतिक्रिया उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दिली


सज्जात सोयीचे वाटणारे तलाठी कार्यालय गैरसोयीचेच

शेतकऱ्यांना लागणाऱ्या  विविध कामासाठी सातबारा या शहरात असलेल्या तलाठी कार्यालयातून उपलब्ध होतात आणि शहरात असलेल्या विविध कार्यालयात द्याव्या लागतात शिवाय कार्यालयीन वेळेत ग्रामीण भागात लोडशेडिंग अभावी सातबारा मिळणे अडचणीचे होईल सज्जात सातबारा उपलब्ध करून देणे सोयीचे असले तरी उद्भवणाऱ्या अडचणीमुळे गैरसोयीचेच आहे म्हणून सज्जात सोयीचे वाटणारे तलाठी कार्यालय गैरसोयीचेच होईल अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें