ग्रंथ हेच आयुष्याला खरी कलाटणी देतात : बोराडे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 17 अक्टूबर 2018

ग्रंथ हेच आयुष्याला खरी कलाटणी देतात : बोराडे.



सेलू प्रतिनिधी.
ग्रंथ हे मानवास परिपूर्ण करतात. जीवनात मार्गदर्शक,पथदर्शक बनवून आयुष्याला योग्य कलाटणी देतात. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनाला खरी प्रेरणा ग्रंथामुळेच मिळाली त्यामुळे विद्याध्यांनी सुद्धा प्रर्थ वाचनातून सविवेकाची प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन सेलूचे
नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी केले. येथील नूतन कन्या प्रशालेत आयोजित वाचन प्रेरणा दिनानिमित्त करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्रशालेच्या शालेय
समितीचे अध्यक्ष नंदकिशोर बाहेती, दत्ताव पावडे, मुख्याध्यापिका चाटेउप मुख्याध्यापक रणखांबे, पर्यवेक्षक
वानरे, नूतन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक के.व्ही.वाघमारे, ग्रंथपाल शिवाजी शिंदे हे उपस्थित होतेकार्यक्रमाची सुरुवात
डॉ ए. पी.जे.अब्दुल कलाम व स्व.स.दुगताई यांच्या
प्रतिमेच्या पूजनाने झाली. कार्यक्रमासाठी स्वागतगीत हेमलता देशमुख यांनी व त्यांच्या संचाने सादर केले. प्रास्ताविक ग्रंथपाल
शिवाजी शिंदे यांनी केले. याप्रसग कु.मृदुला नंदपूरकार,  सानिका देऊळगावकर यांनी ङ.कलाम यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले. ग्रंथालयाच्यावतीने करण्यात आलेल्या
भितीपत्रकाचे विमोचन प्रमुख पाहुणे विनोद बोराडे यांच्या हस्ते करण्यात आलेयाचे विवेचन घोगरे यांनी केले.अध्यक्षीय
समारोप नंदकिशोर बाहेती यांनी केला. सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले तर आभार रणखांबे यांनी मानले. या निमित्ताने
शहरातील अनेक ग्रंथप्रेमी नागरिकांनी ग्रंथभेट तसेच देणगी दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशाळेतील शिक्षक,
शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें