मुप्टा संघटनेच्या पदधिकाऱ्याची बैठक संपन्न.
जिंतूर प्रतिनिधी,
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत अत्यंत मोलाची भुमिका बजावत असलेल्या शिक्षकांवर काही संस्थाचालक वैयक्तिक हेवेदावे काढण्यासाठी शिक्षकांना आर्थिक, व मानसिक त्रास देत असतात. शिवाय शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांवर प्रशासन व शासन अन्याय करिता असतात. म्हणून अशा शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणारे असल्याचा निर्धार मुप्टा संघटनेचे संस्थापक सचिव प्रा.सुनील मगरे यांनी शिक्षक पदधिकारी बैठकीत व्यक्त केला.
जिंतूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयामध्ये मुप्टा संघटनेच्या रौप्य महोत्सवा निमित्त २३ डिसेंबर रोजी औंरगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनाची पूर्वतयारी म्हणून रविवार ७ ऑक्टोबर रोजी मुप्टा पदधिकाऱ्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुप्टा संघटनेचे अध्यक्ष डॉ. संभाजी वाघमारे याची उपस्थित होती तर मार्गदर्शक म्हणून प्रा.सुनील मगरे हे उपस्थित होते तसेच या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष डॉ.अजय जोंधळे, डॉ. अरुण लेमाडे, प्रा.शिवराम मस्के, प्रा.भास्कर टेकाळे, राजेंद्र जाधव, प्रा.सदानंद पुंडगे, प्रा.यशवंत खडसे, डॉ. समिऊल्ला खान, मुजाहेद सिद्दिकी, आदीची उपस्थित होती. यावेळी जिंतूर तालुका मुप्टा कार्यकारणीचा विस्तार करुण औंरगाबाद येथे होणाऱ्या अधिवेशनाचे पूर्वनियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सिराज नदीव यांनी केले तर सुत्रसंचलन कृष्णा गजभारे यांनी केले व आभार डॉ. अजय जोधळे यांनी मानले या बैठकीस जिंतूर तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सुनील गवई, प्रा.कैलास मुटकुळे, प्रा.रमेश गुडदे, प्रा.कन्हैय्या खोब्रागडे आदीनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें