प्रतिनिधी.धुळे.दि.29/10/2018.
धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे मंगळवेढा तालूक्यातील खवे गावच्या नाथपंथी डवरी समाजातील पाच व्यक्तींची हत्या जुलैमध्ये मूले पळविण्याच्या संशयावरुन करण्यात आली होती.
*जमियत उल्मा-ए-हिंद चे प्रदेश अध्यक्ष मौलाना नदीम सिध्दीकी,मौलाना ईब्राहीम कासमी यांनी सदर कुटुंबियांना भेटून त्यांचे सात्वंन करीत मुलिंच्या लग्नाची व शिक्षणाची जबाबदारी जमियत उल्मा-ए-हिंद तर्फे घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते.*
हत्या झालेल्या भारत
भोसले यांची मुलगी पूजा हिचा विवाह खवे गावातीलच जालिंदर नागू चौगूले यांच्याशी ठरविण्यात आले.त्या गावातील सामाजिक कार्यकृते गौरव भोसले यांनी मौलाना ईब्राहीम कासमी यांच्याशी संपर्क केला.जमियत उल्मा-ए-हिंद च्या पदाधिकार्यांना त्वरीत निर्णय घेवून लग्नासाठी लागणारे सर्व संसार उपयोगी साहित्य व जेवणाची व्यवस्था केली.
ता.२८ आक्टोंबर रविवारी खवे गावात संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यास जमियत उल्मा-ए-हिंद, सोलापूर चे जिल्हाध्यक्ष मौलाना ईब्राहीम कासमी,हाजी कय्यूम जमादार,हसीब नदाफ,यूनूस डोणगावकर,हाफिज अ.हमीद चांदा,म.रफिक ईनामदार,मंगळवेढ्याचे हाफिज रियाज ,हाजी सलीम बागवान,राजू मुल्ला,तसलिम आकुंजेआदी उपस्थित होते.
मंगळवेढ्याचे पोलिस निरिक्षक प्रभाकर मोरे यांंनी जमियतच्या मानवतेच्या दृष्टीने केलेल्या कार्याची प्रंशसा करीत पोलिस प्रशासनातर्फे जमियतचे अभिनंदन यावेळी केले.
यावेळी भटके-विमुक्त विमुक्त संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मच्छीन्द्र भोसले,अ.भा.नाथपंथी डवरी समाजाचे प्रदेश अध्यक्ष प्रा.गौरव इंगोले,महादेव इंगोले,नामदेव इंगोले यांनी जमियत बद्दल गौरवोद्गार काढले.
*आम्ही केलेली मदत हे उपकार नसून ईस्लामने सांगितलेल्या मानव कल्याणाची जबाबदारी पार पाडली आहे,असे वक्तव्य मौलाना ईब्राहीम कासमी यांनी करुन नव-वधूवरास शुभेच्छा व्यक्त केल्या.*
या विवाह सोहळ्यास खवे गावचे सरपंच विकास दूधाळे,सर्कल वाघमारेसाहेब,लक्षण इंगोले,नागनाथ इंगोले, गावकरी व सामाजिक कार्यकृते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें