सोनपेठ येथे वाचन प्रेरणादिन साजरा,वाचने म्हणजे धबधब्याखाली भिजने होय-युवराज माने. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 16 अक्टूबर 2018

सोनपेठ येथे वाचन प्रेरणादिन साजरा,वाचने म्हणजे धबधब्याखाली भिजने होय-युवराज माने.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि.१६ऑक्टोबर २०१८
सोनपेठ शहर व तालुक्यातील शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रंथ वाचन चळवळ सोनपेठ च्यावतीने यानिमित्त सोनपेठ व सेलू तालूक्यातील आठ शाळांना पुस्तके भेट देण्यात आली.
शहरातील जि.प.प्रशाळेच्या सावित्रीबाई फुले सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी ग्रंथ वाचन चळवळीच्यावतीने तालूकास्तरावर चवथ्या वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक सुमीत लांडे यांच्या अध्यक्षतेखाली पारपडलेल्या या कार्यक्रमास जि.प.प्रा.शाळा पारडी ता.सेलू येथील साहित्यिक सहशिक्षक युवराज माने यांची मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती. तर गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण, सतिष देशमुख, किरण पतंगे यांच्या प्रमुख उपस्थितीसह जि.प.प्रा.शाळा पारडीच्या कु.काजल राठोड, अनुराधा शेळके या विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम, ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे व ग्रंथ पुजनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना युवराज माने यांनी त्यांच्या शाळेतील मुलांची पुस्तकांची व वाचनाची भुक भागविण्यासाठी पुस्तक भिसी या अभिनव उपक्रमाची सुरूवात केल्याचे सांगून; पुस्तक वाचने म्हणजे धबधब्याखाली भिजने होय, आणि या धबधब्याखाली जो जाईल तो भिजल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले. पुढे बोलतांना वाचन चळवळ काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगीतले. सोनपेठ सारख्या शहरात सुरू असलेल्या ग्रंथ वाचन चळवळीचे अभिनंदनही त्यांंनी यावेळी  केले.
गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण यांनी वाचनाच्या माध्यमातून जे पुढे जातात तेच ज्ञानवंत होतात असे प्रतिपादन केले, कु.काजल राठोड व अनुराधा शेळके या विद्यार्थिनिंनीही अभ्यासपुर्ण मनोगत व्यक्त करताना वाचनाचे महत्व पटवुन दिले. कार्यक्रमास उपस्थित सर्व पाहुण्यांचा पुस्तक व गुलाब पुष्प भेट देवुन सत्कार करण्यात आला.  तर सोनपेठ सेलू या तालुक्यातील आठ शाळांना ग्रंथ वाचन चळवळीच्या वतीने ग्रंथ भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर यांनी आजपर्यंतच्या चळवळीच्या ग्रंथदान उपक्रमाची माहिती देत, आजवर चळवळीच्या माध्यमातून ग्रंथदान करणाऱ्या सर्वांचे, चळवळीच्या प्रत्येक उपक्रमास वेळोवेळी प्रसिद्धी दिल्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे व चळवळीच्या सर्व सदस्यांचे  आभार व्यक्त केले.
यावेळी कु. संध्या सुर्यवंशी, शेख रूकसार व निशाद शेख या विद्यार्थिनिंनी स्वागत गीत तर मधुरा आपेट हिने प्रार्थना गायली.
या कार्यक्रमास सहशिक्षक के.बी.रत्नपारखे, डी.के.पवार, शेख, धसकटे, किशोर धिवार, सुधाकर कदम, आश्रोबा सावंत, संदीप लष्करे, नितीन सज्जनशेट्टी, वाजेद शेख, रविकुमार स्वामी, श्रीमती सरस्वती रोडे, उर्मिला राठोड, परशुराम सावंत, विकास झम्पले, ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर, सदस्य तथा शिवमल्हार वाघे, महेश जाधव, अतूल कोरपे, बाबासाहेब गर्जे, राधेश्याम वर्मा, पत्रकार किरण स्वामी, गणेश पाटील, देवानंद सौंदळे विद्यालयाचे विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथ वाचन चळवळीचे सदस्य व विकास झम्पले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.संध्या सुर्यवंशी, रूक्सार शेख आणि सहशिक्षक संदीप लष्करे यांनी केले तर बाबासाहेब गर्जे यांनी आभार व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें