भोकरदन शहरात कॅरिबॅग दुकानावर धाड.६१की.३८२ ग्रॅ. कॅरीबॅग जप्त. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 7 अक्टूबर 2018

भोकरदन शहरात कॅरिबॅग दुकानावर धाड.६१की.३८२ ग्रॅ. कॅरीबॅग जप्त.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक जालना पथकाची कारवाई.


भोकरदन प्रतिनिधी : शहरात शनिवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक जलनाच्या कार्यालयाचे पथकाने धाड टाकून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या सुमारे ६१ किलो ३८२ ग्रॅम. प्लास्टिकच्या कॅरीबॅग जप्त केल्या.यात खाजु किराणा,प्रेमचंद अँड कंपनी,विरेंद्र जनरल स्टोर,अश्रफ युसूफ कच्ची, माऊली किराणा या दुकानदारांकडून पंचवीस हजार रुपये, प्रत्येकी ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले . शहरात  कॅरीबॅग दुकानावर कारवाई हरून एकूण सतरा दुकानावर धाड टाकून त्यात पाच दुकानावर कॅरीबॅग आढळून आले व त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड देण्यात आले. शनिवारी शहरातचा आठवडी बाजार असल्याने व्यपारीवर्गात मोठी धावपळ उडाली होती.ही कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक जालना कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी दिपाली लोखंडे व महेश चलवा व भोकरदन नगरपरिषदेचे कर्मचारी बबन,प्रमोद प्रसाद,पंजाब जाधव,बजरंग,अमित गुंटूक आदिंनी ही कारवाई केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें