सोनपेठ(राजेश खेडकर) दि.०८ऑक्टोबर २०१८
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त विशेष मुलांसाठी सोनपेठ येथील सुर्योदय परिवार व लातुर येथील सक्षम संस्थेच्या वतीने मेंदुविकार तज्ञ डॉ.देवाशिष रुईकर यांचे विषेश मुलांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सुर्योदय परिवाराचे धनंजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सक्षम व संवेदना लातुर या संस्थेचे श्रीराम शिंदे, योगेश बुरांडे, डॉ.भगवान देशमुख यांच्यासह शिबिराचे संयोजक सुधीर बिंदू, राकेश मेहता, महेश देशमुख, सिध्देश्वर गिरी, राजेश फले, मोहन खोडवे, अंगद काकडे आदींंची उपस्थिती होती. या वेळी सोनपेठ शहर व परिसरातील तीस विषेश मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सुर्योदय परिवाराने लातुर येथील संवेदना या शाळेच्या मदतीने व सक्षम या संस्थेच्या मदतीने वर्षभरापासुन विशेष मुलांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. लवकरच सोनपेठ येथे दिव्यांगांच्या मदती साठी आधार केंद्र व बाधीत मुलांसाठी फिजीओथेरेपी केंद्र सुरु करणार असल्याचे सुधीर बिंदू यांनी सांगितले. परिसरातील दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व आरोग्यासाठी विषेश शिबिरांचे आयोजन सातत्याने सुरु राहणार असल्याचेही यावेळीसां त्यांनी सांगितल. या शिबिरात डॉ. रुईकर यांनी विषेश मुलांच्या पालकांना मार्गदर्शन केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें