औरंगाबाद- योगेश तू.मोरे यांच्या 'किलबिलाट' कादंबरीवर चित्रपट "बंगाट" लवकरच होणार प्रदर्शित. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 16 अक्टूबर 2018

औरंगाबाद- योगेश तू.मोरे यांच्या 'किलबिलाट' कादंबरीवर चित्रपट "बंगाट" लवकरच होणार प्रदर्शित.


 औरंगाबाद जिल्ह्यापासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर वसलेल्या छोट्याशा गंगापूर या ग्रामीण भागात वास्तवास असलेले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच परिचित असे छोटेसे व्यक्तिमत्त्व म्हणजे मराठी साहित्यिक,व्याख्याते तथा गीतकार संगीतकार प्रसिद्ध लेखक योगेश तुळशीराम मोरे यांचं बालपण गंगापूरमध्येच गेलं.त्यांनी जि. परिषद शाळा तुळशीबाग या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले.आणि उच्य माध्यमिक न्यू हायस्कूल गंगापूर या शिकत असताना शाळेतील त्यांच्या गुरुवर्यांनी एक भाकीत केलते  की, हा माझा गुणी विद्यार्थी नक्कीच एक दिवस सर्वसामान्य ग्रामीण भागातील कलाकारांना नक्कीच एक व्यासपीठ मिळवून देईल आणि सम्पूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं यशस्वी कार्य करेल आणि या निकषानुसारच योगेश तू.मोरे यांनी लिहिलेल्या शालेय विद्यार्थी जीवनावर आधारित "भरकटलेल्या पक्षाचा किलबिलाट"व "द श्रील चर्प ऑफ अ लॉस्ट बर्ड" या कादंबरीवर विनोद बागुल सर सिनेअभीनेते लवकरच "बंगाट" मराठी चित्रपट बनवणार असून या चित्रपटात विनोद बागुल सर स्वतः निर्माता,सहनिर्देशक भूमकर साहेब मुंबई तसेच  यामध्ये प्रमुख भूमिका विनोद बागुल,योगेश मोरे, महेश मोरे,अबोट इंटरनॅशनलचे दादासाहेब जाधव,स्वप्नील ठाकूर यांची असणार आहे आणि यामध्ये गीतकार व संगीतकार संजय कुलकर्णी,बंडोपंत औताडे,गायक दीपक राऊत यांच्या मधुर आवाजातील गाणी प्रेक्षकांना ऐकण्यास मिळणार आहे.तसेच या चित्रपटात मराठवाड्यातील सर्वच ग्रामीण भागातील गुणी अभिनय कौशल्य असणाऱ्या कलाकारांचा समावेश असणार आहे आणि बंगाट या चित्रपटाला नक्कीच तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांची दाद मिळेल असा विश्वास सिनेअभिनेते विनोद बागुल यांनी व्यक्त केलेला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें