महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.सेवानिवृत्त शिक्षक एन.व्ही.स्वामी यांनी याप्रसंगी केले ग्रंथदान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 2 अक्टूबर 2018

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.सेवानिवृत्त शिक्षक एन.व्ही.स्वामी यांनी याप्रसंगी केले ग्रंथदान.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०२ऑक्टोबर २०१८
येथील जि.प. प्रशाळेच्या क्रांतीजी सावित्रीबाई फुले सभागृहात दि.०२ऑक्टोबर मंगळवार रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद मुख्याध्यापक सुमित लांडे व विद्यार्थी प्रतिनिधी सूरज सागरे यांनी पार पाडले. यावेळी विचार मंचावर सेवानिवृत्त सहशिक्षक नंदकुमार स्वामी, ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर, सदस्य प्रा,डॉ.संतोष राणखांब व पत्रकार सुभाष सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी मेघा कुरुडे, ममता कुरुडे व शुभांगी पोटे या विद्यार्थिनिंनी स्वागतपर गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून महात्मा गांधी व लालबहादूर शास्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना स्वतःच्या उज्वल भविष्यासाठी पुस्तकांचे वाचन करण्याचे आवाहन केले. शाळेच्या अनेक विद्यार्थिनींनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
आगमी वाचन प्रेरणा दिनासाठी तालुक्यातील शाळांना भेट देन्यासाठी ग्रंथ वाचन चळवळीस पुस्तके भेट देण्याचे आवाहन नुकतेच चळवळीच्यावतीने केले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देत शहरातील श्री महालिंगेश्वर विद्यालयाचे सेवानिवृत्त सहशिक्षक नंदकुमार स्वामी त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने ग्रंथ वाचन चळवळ सोनपेठ यांना पुस्तके भेट दिली. मुख्याध्यापक सुमीत लांडे यांनी अध्यक्षीय समारोपाचे भाषण केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीच्या विद्यार्थीनी शेख महेक व सय्यद सादीया यांनी केले तर सहशिक्षक सावंत व विद्यार्थी प्रतिनिधी अनुजा वेदपाठक हिने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, सहशिक्षक सुुधाकर कदम, सावंत मामा, झम्पले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप रविकुमार स्वामी यांच्या नेतृत्वात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें