चंद्रकला काटे यांची अध्यक्ष तर सय्यद मूनवरबी मोसीन यांची उपाध्यक्षपदी निवड.
सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०१ऑक्टोबर २०१८
येथील जिल्हा परिषद प्रशाळेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुुुुले सभागृहात दि.०१ऑक्टोबर सोमवार रोजी मावळत्या शालेय समितीच्या अध्यक्षा उषाताई कडतन यांच्या अध्यक्षतेखाली व पत्रकार राधेश्याम वर्मा, सुनील रंजवे, धनंजय देशमुख व सैफुल्ला सौदागर यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासाठी पालक सभा संपन्न झाली. शाळेचे मुख्याध्यापक सुमित लांडे यांनी आरक्षणा बाबत नियम व अटींंची माहती दिली, नंतर उपस्थितातून सर्व संंमतीने चंद्रकला काटे, शेख दौलत, सय्यद मूनवरबी, शेख रुबिना, सय्यद बीबीसायरा, तुकाराम पोटे, शिवकन्या पंचांगे, राहुकेतू मुंढे व श्रीकांत आव्हाड यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली, अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानात चंद्रकला काटे यांंना ०५ तर शेख दौलत यांना ०४ नवनिर्वाचित सदस्यांनी पसंती दर्शवली. यानुुुसार सौ.चंद्रकला काटे या एका मताधिक्यानेे शालेय व्यवस्थापण समितीच्या अध्यक्षा तर सय्यद मूनवरबी मोसीन या सर्वानुमते उपाध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या, या नंतर नवनियुक्त अध्यक्षा व उपाध्यक्षांंसह सर्व सदस्यांचा मुख्याध्यापक सुमित लांडे, पालक उत्तमराव वळसे, बळीराम काटे, माऊली वाघमारे, राजेभाऊ घुगे यांच्या हस्ते हार व पुष्पगुच्छ देेऊन सत्कार करण्यात आला,
या निवड प्रक्रियेवेळी सहशिक्षक सुधाकर कदम, सज्जनशेट्टी, सावंत, संदीप लष्करे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सहशिक शुभम भोसले व रविकुमार स्वामी यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें