शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव
काही नगरसेवक नगराध्यक्ष अधिकारी आणि मी जिल्हाधिकारी यांना भेटलो...
कोपरगाव नगरपरिषद साठवण तलाव क्र ४ चे विस्तारीकरणाचे काम जिल्हाधिकारी यांचे काम बंद करा असे आदेश नसतानाही बंद ठेवले... खाली खडक लागला पण फोडण्यासाठी तांत्रिक मान्यता मिळून देखील प्रशासकीय मान्यता मिळवली नाही तात्कालिक मंडळाने...असे नगरपरिषद चे मत..
*माती वाहतूक भ्रष्टाचार प्रकरण प्रलंबित आहे चौकशी त्वरीत करण्याचे निर्देश दिलेत...*
तळ्याच्या विस्तारीकरणाचा निधी परत गेला त्यामुळे नवीन प्रस्ताव पाठवणे.. असे जिल्हाधिकारी यांनी सुचविले तत्राप निधी उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त झाली...
*कोपरगाव नगरपरिषद ला नांदुरमधमेश्वर जलद कालव्यावरून पाणीपुरवठा केल्यास कोपरगाव शहराला आठ ते दहा अवर्तने वाढतील असे माझे मत मी मांडले... जिल्हाधिकारी यांनी नगराध्यक्ष यांना त्वरीत प्रस्ताव पाठवा मी शासनाकडून तात्काळ मान्यता मिळवून देतो स्पष्ट केले*
कोपरगाव शहराच्या एका तळ्याचा गाळ मी व मा आमदार यांनी भिक्षा मागून गाळ काढला होता... त्यात दोन मीटर खोल गाळ निघाला.होता.... परंतू इतर तीनही तळ्यात इतकाच खोल गाळ असल्याने तो तज्ञ विभागाच्या निगराणीत काढल्यास शहरासाठी अधिक चार ते पाच अवर्तने वाढू शकतात .... त्यास जिल्हाधिकारी यांनी तात्काळ निधी देण्याचे मान्य केले प्रस्ताव पाठवण्यास सांगितले ...
*कोपरगाव च्या तळ्याच्या शेजारीच येवला नगरपरिषद चे एक तळे आहे... १९९० पासून येवला शहराची हि योजना बंद आहे... जर कोपरगाव शहराला हे तळे मालकी ने मिळाले तर शहराला दहा ते पंधरा आवर्तने तळे खोल केल्यास मिळतील.... जिल्हाधिकारी स्वतः नासिक जिल्हाधिकारी यांचे सोबत चर्चा करून प्रश्न सोडवणार....नगरपरिषद ने प्रस्ताव द्यावा*
कोपरगाव नगरपरिषद मध्ये ११५०० घरांना ४५मिनीटे पाणी पुरवठा एकूण ९००० तास चालतो एका आवर्तन मध्ये ..
व मेन लाईन वरील १५०० नळजोड १० ते १५ हजार तास पाणी पुरवठा करतात...त्यामुळे मेन लाईन वरील सर्व नळजोड त्वरीत बंद व्हावे..असे माझे मत... नगराध्यक्ष म्हणाले कि तोडण्याचे आदेश दिलेत पण आधिकारी कर्मचदिलेले घाबरतात... त्यामुळे कारवाई होत नाही... जिल्हाधिकारी यांनी त्या आदेशांच्या प्रती पाठवण्यास सांगितले व पोलीस संरक्षण मध्ये युद्ध पातळीवर काम करण्यासाठी निर्देश दिले
वरील प्रमाणे चारही योजना राबवल्यास तात्काळ कमीत कमी शहराला एकदिवस आड पाणी प्राप्त होऊ शकते व तेही स्वस्तात व लवकरच.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें