सेलू नगरपालिकेने आठवडी बाजारातील दोन दुकानाचे अतिक्रमण हटवले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 12 अक्टूबर 2018

सेलू नगरपालिकेने आठवडी बाजारातील दोन दुकानाचे अतिक्रमण हटवले.

मोंढ्या मधिल अतिक्रमण हटविल्या नंतर आठवडी बाजारात कारवाई.


सेलू! प्रतिनिधी शमशेर खान

सेलू शहरातील वाढते अतिक्रमण नगर परिषद ,सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी वेळीच दखल न घेतल्यामुळे  दिवसेंदिवस वाढत  असेचं
 बेकायदेशीर ठरलेले  आठवडी बाजार येथील अतिक्रमण गुरुवार ११ ऑक्टोंबर रोजी  सकाळी ११-३० वाजता नगर पालिकेच्या पथकाने पोलीस संरक्षणात काढले आहे.
यापूर्वी नगरपालिकेच्या पथकाने बाजार समितीच्या एका संचालकाने मोंढ्यात केलेले अतिक्रमण काढले होते. शहरात जवाहररोड, श्रीकेशवराज बाबासाहेब रोड ,स्टेशन ते रायगड काँर्नर नुतन विद्यालय रोड या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी असलेले अतिक्रमण मात्र राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केल्यामुळे ते हटविण्यास नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग सतत चालढकल करत आहे.यामुळेच शहरातील अतिक्रमणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
  आठवडी बाजार मध्ये विष्णू चव्हाण व राजू चव्हाण यांचे लोखंडी अंगल चे अतिक्रमण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही त्यांनी अतिक्रमण काढले नाही. तेव्हा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी देविदास जाधव  यांनी पोलीस बंदोबस्तात  हे अतिक्रमण काढले  अशी माहिती स्वच्छता विभाग प्रमुख सुदाम राठोड यांनी यावेळी दिली. नगरपालिकेने अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून दिला . इतर ठिकाणी असलेल्या अतिक्रमणाला अशीच सवड काढून अतिक्रमण हटविले तर शहरातील सर्वच रस्ते मोकळा स्वास घेतील आणि पादचारी व वाहन धारकांना धड चालता फिरता येईल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें