सोनपेठ(राजेश खेडकर) दि.११ऑक्टोबर २०१८.
सोनपेठ तालूक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील आदर्श ठरलेल्या मौ. वाणीसंगम येथील जि.प.प्रा.शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक डी.के.पवार यांनी सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्या आवाहनास प्रतिसाद देत आज दि.११ऑक्टोबर रोजी आगामी वाचन प्रेरणा दिनी जिल्ह्यातील इतर शाळांना देण्यासाठी पुस्तके भेट दिली.
शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात प्रथम सहशिक्षक नागनाथ जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रावर माहिती दिली. पुढील आठवड्यातील प्रत्येक दिवशी एकेकाने देशातील थोर समाजसेवक व क्रांतिकारक यांच्या चरित्र ग्रंथाचे वाचन करण्याचे व परिपाठात त्याविषयी बोलण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. मुख्याध्यापक डी.के.पवार यांनी विद्यार्थ्यांच्या भाषण कौशल्य व इतर कला गुणांविषयी गौरवोद्गार काढून अधिक परिश्रम करून यात दिवसागणिक वाढ करण्याचा सल्ला दिला, तर सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर यांनी पुस्तकांचे वाचन करून आपल्या बुध्दीमत्तेचा विकास करण्याचे व पुस्तके लहान बहिण भावाप्रमाणे जपावीत असे सांगून अमुल्य अशा ग्रंथ भेटीबद्दल चळवळीच्यावतीने डी.के.पवार यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी मुख्याध्यापक डी.के.पवार, नागनाथ जाधव, सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर, सहशिक्षक संतोष डांगे यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें