पीक कापणी प्रयोग शेतकरी हिताचा देण्यात यावा.... आमदार विजय भांबळे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 5 अक्टूबर 2018

पीक कापणी प्रयोग शेतकरी हिताचा देण्यात यावा.... आमदार विजय भांबळे.


सेलू प्रतिनिधी.दि.05/10/2018.

सेलू यावर्षी पावसाने तीन चार महिन्यापासून दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला पिकाचा घास पावसाने हिरावून घेतला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात मोठ्या प्रमाणात खर्च आता कसं काय निघणार या चिंतेत शेतकरी असून तरी तो शेतात काम करत आहे
सोयाबीन,मूग,उडीद व कापूस हे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहेत. सोयाबीनच्या शेंगा या पावसामुळे भरल्या नाहीत कापूस या पिकावर लाल रोग पसरल्यामुळे व बोंड आळी मुळे प्रचंड नुकसान शेतक-याना सोसावे लागत आहे. मूग उडीदाचे पीक हे कसेबसे आले पण तेसुद्धा शेतकऱ्यांचे हातचे गेले. पाऊस नसल्याने गंभीर परिस्थिती निर्मान होत आहे. यामुळे पिक कापणी प्रयोग हा शेतक-यांच्या बाजूने देण्यात यावा असे आमदार विजय भांबळे म्हणाले

शेतकऱ्यांचे पीक कापणी मुळे नुकसान होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी यासाठी आ.विजय भांबळे यांनी गुरुवार(4.10) रोजी सेलू तहसील कार्यालयात तहसीलदार सह महसूल ते सर्व मंडळ अधिकारी तालुका कृषी अधिकारी व त्यांचे मंडळ अधिकारी यांची बैठक लावून शेतकऱ्यांचे पीक कापणी प्रयोग करताना नुकसान होता कामा नये असे आदेश त्यांनी दिले.
यावेळी सभापती पुरुषोत्तम पावडे, तालुका अध्यक्ष माऊली ताठे, तालुका कार्याध्यक्ष सुधाकर रोकडे,जी.प सदस्य रामराव उबाळे, अजय डासाळकर, परवेज लाला,गौस लाला, पप्पू गाडेकर,नबाजी खेडकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, नायब तहसीलदार तुकाराम सुगंधे, कृषी अधिकारी कांबळे व दोन्ही कार्यालयाचे मंडळ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें