‘९० वर्षे चड्डी घालणा-या RSS ने संविधान दिले नाही, ते बाबासाहेबांनी दिले’=असदुद्दिन ओवैसी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 3 अक्टूबर 2018

‘९० वर्षे चड्डी घालणा-या RSS ने संविधान दिले नाही, ते बाबासाहेबांनी दिले’=असदुद्दिन ओवैसी.

एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बहुजन आणि मुस्लिमांना न्याय देण्यासाठी ही आघाडी असल्याचे म्हटले.

प्रतिनिधी.औरंगाबाद.दि.02/10/2018.
६.११ : छोट्या व्यापा-यांना आवाहन आहे की त्यांनी खुल्या व्यापा-याला, गॅट कराराल पाठिंबा देऊ नये. आज जशी शेतक-याला आत्महत्या करण्याची वेळ आली तशीच वेळ छोट्या आणि मध्यम व्यापा-यांना १० वर्षांनी येईल.
६.०९ : पेट्रोलचे दर वाढतच चालले आहेत, त्याचे कारण रिलायन्सची दिवाळखोरी घालवणे आहे. पेट्रोल फक्त सरकारी कंपन्याच विकत नाही तर रिलायन्सही पेट्रोल विक्री करते. त्यांची दिवाळखोरी थांबवण्यासाठी पेट्रोलचे दर वाढवले जात आहे.
६.०८ : मोदी हे स्वतः खात नाहीत, ते दुस-याला खाऊ घालतात आणि त्यातला वाटा घेतात.
६.०७ : आपल्याला शांतता ठेवली पाहिजे. भाजपला अशांतता हवी आहे. एकदा का अशांतता निर्माण झाली की आणीबाणी लावण्याची त्यांची तयारी आहे.
६.०५ : मोदींच्या सरकारच्या काळात नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई केली जाते मात्र सनातन्यांवर कारवाई होत नाही. सनातनकडे बॉम्ब कसे आले?
६.०४ : महाराष्ट्रातील ओबीसींना आवाहन आहे की आपण मॉब लिंचिंगपासून दूर राहिले पाहिजे. कायदा आपण हातात घेतला नाही पाहिजे आणि कोणाला घेऊ देणार नाही अशी आपली भूमिका राहिली पाहिजे.
६.०३ : देशाच्या राजकारणात द्वेष पसरवला जात आहे. या राजकारणाला मुठमाती दिली पाहिजे. आपल्याला देशात ‘भाईचारा’ निर्माण कारयचा आहे.

५.४६ : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणाला सुरुवात.

५.४४ : प्रकाश आंबेडकरांच्या मागे आम्ही उभे राहू तुमचे आणि आमच्या समस्या एक आहेत. आपल्याला पुढे जायचे असेल तर एकत्रच जावे लागेल.
५.४१ : या सभेला येणा-यांनी फक्त येथे येऊन टाळ्या वाजवून घरी गेले तर चालणार नाही. आपल्याला आपले भविष्य आपल्या हाताने लिहायचे आहे.
५.४० : एकीकडे भाजपचे अपयशी धोरण फसवे मोदी आणि दुसरीकडे जातियवादी काँग्रेस आहे.
५.३६ : महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत. फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे.
५.३५ : नालीतून गॅस काढून तुम्ही (मोदी) चहा बनवलाय का कधी? पेट्रोल १०० रुपयांवर गेले आहे.

५.२४ : जे लोक फक्त मतदानाच्या वेळेस तुमच्याकडे येतात, तुमच्यासोबत जेवण घेतात त्यांना मतदान करु नका. तर जे रोज तुमच्यासोबत असतात. तुमच्या ताटात जेवतात त्यांना मत द्या.

५.२२ : उद्यापासून सर्व वृत्तपत्र आणि टीव्हीवर चर्चा सुरु होईल की प्रकाश आंबेडकर मत विभागणीसाठी उभे राहिले आहेत. माझ्या बंधू, माता भगिनींनी बाबासाहेबांनी संविधानात आपल्याला मताचा अधिकार दिला आहे. पण बाबासाहेबांनी असे नाही सांगितले की तुम्ही काँग्रेस, गांधी घराण्याला मत द्या, मोदी-फडणवीसांना मत द्या, त्यांनी सांगितले होते प्रथम स्वतःला मत द्या.

५.२१ : बंधुभाव निर्माण करण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. आता वेळ आली आहे की आपल्याला ‘भाईचारा’ निर्माण करावा लागेल.

५.२० : हिंदूस्तानचे कब्रस्थान आमच्या वफादारीची साक्ष देत आहेत.

५.१६ : महाराष्ट्राचे एक साहेब (शरद पवार) संविधान वाचवण्याची भाषा करत आहेत. त्यांना त्यांच्या पुतण्याला वाचवायचे आहे. जे स्वतः बुडायला लागले आहेत, ते संविधान काय वाचवतील. संविधान आम्हीच वाचवणार आहोत.

५.१३ : बाबासाहेबांना संविधान सभेत काँग्रेसने नाही तर बंगालच्या मुस्लिमांनी पाठवले होते. आता प्रकाश आंबेडकरांना लोकसभेत आम्ही पाठवू.

५.१० : जर संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले तर मग आपण का सत्ताधारी व्हायचे नाही. आपणही सत्ताधारी व्हायचे आहे. बाबासाहेबांनी समतेचा अधिकार सर्वांना दिला.
५.०७ : देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जेव्हा संविधान नव्हते तेव्हा दलित, बहुजनांना, मेहतारांना माणुसकीचे जीवन जगता येत नव्हते. पिण्याचे पाणीही त्यांना दिले जात नव्हते. जेव्हा संविधान लागू झाले तेव्हा गरीब, बहुजन, वंचित, दलितांना हे सर्व हक्क मिळाले. हे संविधान मोदी-फडणवीस सरकारने दिले नाही. काँग्रेस गांधी कुटुंबाने दिले नाही. हे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले.

५.०० : बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या भाषणाला सुरुवात.

४.५६ : वंचित बहुजन आघाडीचे सरकार आले तर एकाही शेतक-याला आत्महत्या करु देणार नाही. शेतकरी जगला तर देश जगेल.

४.५३ : आपले एक-एक घर आणि एक-एक गाव किल्ला केला पाहिजे. आपले मत दुस-या कोणाला न देता आपल्याच वंचित बहुजन उमेदवाराला देऊन प्रकाश आबंडेकरांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे आहे. – लक्ष्मन माने.

४.५२ : आम्ही वंचित समाजातील सर्वात वंचित लोक आहोत. आमच्याकडे स्वतःचे घरदार नाही. रेशन कार्ड नाही. – लक्ष्मन माने.

४.५१ : लक्ष्मण माने यांच्या भाषणाला सुरुवात.

४.४६ : विजय मोरे यांनी उपस्थितांना दिली आपले मत वंचित बहुजन आघाडीला देण्याची शपथ उपस्थित जनसमुदायाला दिली.

४.४० : आपण समतेचे राजकारण करणार असू, तर त्यामध्ये महिलांच्या ५० टक्के जागांचे काय? याचेही धोरण आपण ठरवले पाहिजे. – रेखा ठाकूर

४.३५ : संभाजी भिडेंवरील गुन्हे मागे घेण्याचे काम फडणवीस सरकारने केले, त्याआधी ही विषवल्ली वाढवण्याचे काम शरद पवार यांच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी शासनाने केले होते. रेखा ठाकूर

४.३० :  भारिप बहुजन महासंघाच्या महिला आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर यांच्या भाषणाला सुरुवात.

प्रकाश आंबेडकर आमचे मोठे बंधू -MIM आमदार इम्तियाज जलील यांची घोषणा

एमआयएमचे औरंगाबाद मध्यचे आमदार इम्तियाज जलील.
४.१० : महाराष्ट्रात यापुढे दलित आणि मुस्लिम यांची आघाडी राज्य करणार आहे. या आघाडीने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. २०१९ मध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरही लोकसभेत जातील तेव्हा विरोधकांनाही भीती वाटल्याशिवाय राहाणार नाही, असा विश्वास एमआयएमचे औरंगाबाद मध्यचे आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद – वंचित बहुजन आघाडीच्या शेतकरी महाअधिवेशनला औरंगाबादेत सुरुवात झाली आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या प्रमुख उपस्थित होत असलेल्या या अधिवेशनाला कार्यकर्त्यांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती आहे. औरंगाबाद येथील जबिंदा मैदानावर होत असलेल्या या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून कार्यकर्ते आणि दलित, बहुजन, वंचित, मुस्लिम समुदाय आला आहे. बीड बायपास मार्ग कार्यकर्त्यांनी हिरवे, निळे आणि पिवळ्या झेंड्याने फुलून गेला आहे. उड्डाण पुलावरही लोकांनी गर्दी केली आहे. तरुणांमध्ये या अधिवेशनाच्या निमित्ताने मोठा उत्साह औरंगाबादमध्ये दिसत आहे. या अधिवेशनाची वेळ दुपारी १२ वाजताची होती, मात्र तब्बल दोन तास उशिराने सभेला सुरुवात झाली आहे. तळपत्या उन्हातही लोक ओवेसी आणि आंबेडकरांना ऐकण्यासाठी थांबले आहेत.

अंधेरो को यही खल रहा है..
दिया मेरा हवा मे जल रहा है!
आमच्यावर हा आरोप होत आहे की हे दोन्ही समाज एकत्र आले तर कोणाला तरी फायदा होईल कोणाचा तरी तोटा होईल. परंतू आज येथे सांगितले पाहिजे की ७० वर्षे आम्ही तुमच्या फायद्यासाठी काम केले. आता आम्ही आमच्यासाठी काम करणार आहोत. आता नवरदेवही आम्हीच असू आणि बारातही आमचीच निघणार आहे, असा विश्वास आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.

वंचित बहुजन आघाडी – एमआयएमच्या शेतकरी महाअधिवेशनाला जमलेली गर्दी.
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम आघाडीची अधिकृत घोषणा या अधिवेशनातून दोन्ही नेते करणार आहेत. त्यामुळे या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मंचावर प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी, औरंगाबाद मध्यचे आमदार इम्तियाज जलील, भिवंडीचे आमदार वारिस पठाण, एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी, वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने सभेचे संयोजक अमित भुईगळ उपस्थित आहेत.

दलित, आदिवासी, बहुजन समाजातील विविध जातींना एकत्र करण्याचे काम वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकर करत आहेत. वंचित आघाडीची सोलपूरमध्ये नुकतीच सभा झाली. या सभेला मिळालेला प्रतिसाद आणि आता या आघाडीसोबत एमआयएम येऊन मिळाल्याने महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी देणारी ही आघाडी राहाणार असल्याचे या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

आंबेडकर आणि ओवेसी या दोन्ही नेत्यांची गुप्त बैठक सोमवारी रात्री झाली. एमआयएमचे औरंगाबाद मध्यचे आमदार इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीत आगामी काळात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम कशा पद्धतीने पुढे जातील याविषयी चर्चा झाली. आजच्या सभेत ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.दिले’
एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बहुजन आणि मुस्लिमांना न्याय देण्यासाठी ही आघाडी असल्याचे म्हटले.
उन्मेष खंडाळे : प्रहार वेब टीम

आंबेडकर आणि ओवेसी या दोन्ही नेत्यांची गुप्त बैठक सोमवारी रात्री झाली. एमआयएमचे औरंगाबाद मध्यचे आमदार इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीत आगामी काळात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम कशा पद्धतीने पुढे जातील याविषयी चर्चा झाली. आजच्या सभेत ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें