तोष्णीवाल यांच्या पेट्रोल पंपावरील चोरीच्या घटनेत नौकरच आरोपी.
सेलू प्रतिनिधी
तालुक्यातील वालुर येथील तोष्णीवाल यांच्या पेट्रोल पंपावरील चोरीप्रकरणी पोलिसांनी पेट्रोल पंपावरील एका नौकरासह त्यांच्या सहकारी मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही ही आरोपींना सेलू न्यायालयात गुरुवार 13 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले असता न्यायालयाने 15 सप्टेंबर पर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे .याबाबतची माहिती या प्रमाणे तालुक्यातील वालुर येथील तोष्णीवाल यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर घटनेच्या दिवशी मध्यरात्री चोरी होऊन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून एक लाख रुपये रोख व नोकरांचे तिन मोबाईलचे सोळा हजार असा एक लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली होती तोष्णीवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते यापैकी तीन जणांना सोडून देण्यात आले तर दोघांना गुरुवार 13 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता ताब्यात घेऊन येऊन त्यांच्यावर गु.र.न.२०९/१८ नुसार नोंद करून कलम 392 457 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींमध्ये पेट्रोल पंपावरील नौकर मोहन मन्मथ काजळे( २२)रा.कोल्हा ता.मानवत व त्यांच्या सहकारी मित्र हरीश अशोक पांढरे(२२)रा.वालुर ता सेलु यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले या दोघांना 15 सप्टेंबर पर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संदिपान शेळके ,रंजीत आगळे हे करत आहेत.
तपासाच्या घिरट्या त्या बाई भोवतीचं.वालुर पेट्रोल पंपावरील चोरीप्रकरणी पोलिसांनी फारशी माहिती तपासाचा भाग म्हणून देण्याचे टाळले असले तरी या घटनेतील सेलू सह वालुर येथील चाललेला तपास त्या महिलेच्या भोवतीच घिरट्या घालत आहे पंपावरील चोरी प्रसंगी घटनास्थळी झोपलेल्या आरोपी नोकरांचा सहकारी हरीश पांढरे यास नाव घेऊन चोरटे आवाज देत होते तत्पूर्वी च एकास या महिलेचे संभाषण झाले होते म्हणून तपास हा त्या महिलेसह तिच्यासोबत गाडीत असलेल्या तरुणां भोवतीच घिरट्या घालत आहे पण तपासाच्या सुरक्षिततेमुळे पोलीस होत असलेल्या चर्चेकडे दुर्लक्ष करीत आहेत आता ताब्यात घेतलेले आरोपीच खरं काय ते सांगतील

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें