आत्मविश्वासाने वाटचाल करा- प्रणिल गिल्डा..
सेलू प्रतिनिधी
सेलू : जीवनातील यशासाठी मुल्यांची कास धरत,गुणांची जोपासना करत आत्मविश्वासाने वाटचाल करावी.असे प्रतिपादन नूतन विद्यालयाच्या कै.रा.ब.गिल्डा सभागृहात शुक्रवार ( दि.१४ ) रोजी नूतन विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल प्रफुल्ल गिल्डा यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया हे होते.तर मंचावर नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डि.के.देशपांडे,कार्यकारणी सदस्य किशोर मालाणी यांची उपस्थिती होती. पुढे आपल्या भाषणात प्रणिल गिल्डा म्हणाले की, चांगली शाळा ही नशीबाने मिळते. या दृष्टीने नूतनचे विद्यार्थी भाग्यवान आहेत. आई,वडील आणि शिक्षक हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतात. विनम्रता,प्रामाणिकपणा सोबत परिश्रम आणि कृतीशीलता विद्यार्थ्यांनी अंगी बाळगावी.विद्यार्थ्यांनी मनोनिग्रहाने फक्त अभ्यास करावा मोबाइल वापरू नये असे ही ते म्हणाले.
संस्थापारितोषिक यादीचे वाचन उपमुख्याध्यापक अनिल कुलकर्णी,अभ्यासपूरक परीक्षा,प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन पर्यवेक्षक अशोक गाजरे,मा.मा.सुर्वे,सुधीर जोशी यांनी केले.अशोक लिंबेकर यांनी लिहिलेले आणि सच्चिदानंद डाखोरे यांनी संगीत दिलेल्या स्वागत गीताचे गायन गीत मंचाच्या विद्यार्थ्यांनी केले.प्रास्ताविक मुख्याध्यापक के.व्ही.वाघमारे यांनी केले.सुञसंचालन सुरेश हिवाळे यांनी तर आभार प्रदर्शन अनंतकुमार विश्वंभर यांनी केले.

फोटो ओळी.सेलू : येथील नूतन विद्यालयाच्या कै.रा.ब.गिल्डा सभागृहात आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करतांना प्रणिल गिल्डा मंचावर डॉ.एस.एम.लोया,डी.के.देशपांडे,किशोर मालाणी,के.व्ही.वाघमारे,अनिल कुलकर्णी,अशोक गाजरे,मा.मा.सुर्वे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें