विवेकानंद म्हणजे भारतीय संस्कृतीचे तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व - डॉ रमेश जाधव शिकागो भाषणाला १२५ वर्ष पूर्ण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 14 सितंबर 2018

विवेकानंद म्हणजे भारतीय संस्कृतीचे तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व - डॉ रमेश जाधव शिकागो भाषणाला १२५ वर्ष पूर्ण.


शिकागो भाषणाला १२५ वर्ष पूर्ण.

सेलू प्रतिनिधी
भा. शि.प्र. संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात दि.११ सप्टेंबर २०१८ मंगळवार रोजी कार्यक्रम घेण्यात आला.दि.११सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत जे ऐतिहासिक भाषण केले त्याला १२५ वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजीनगर विभाग कार्यवाह मा.श्री.डॉ .रमेशजी जाधव हे प्रमुख पाहुणे होते.
डॉ.जाधव पुढे म्हणाले की , विवेकानंदांना भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीबद्दल सार्थ अभिमान होता तरी त्यात शिरलेल्या अनिष्ट रूढी ,परंपरा ,जातीभेद यांसारख्या गोष्टींचा त्यांनी नेहमी विरोध केला.निद्रिस्तांना गदागदा हलवून जागे केले.ते सौदमिनीच्या अभिनिवेशाने समाजाच्या निष्क्रियते वर प्रहार करत व आपल्या देशबांधवांना जागे होण्यासाठी कळकळीचे आवाहन करत. निराकार समाधीत मग्न राहण्याची स्वतः ची स्वाभाविक प्रवृत्ती बाजुला सारून त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या सुख- दुःखाचा ऐहिक पातळीवरही विचार केला आणि त्यांच्यासाठी झटले व परहितार्थ सर्वस्वाचे समर्पण हे वचन सार्थ केले.
शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत केलेल्या भाषणाची सुरुवात ' माझ्या बंधू व भगिनींनो अशी करताच उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.भारतीय संस्कृती व धर्म याबद्दल त्यांनी व्याख्यान दिले.त्यांच्या विचारांचा वारसा आपणही जोपासावा हा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ चौधरी होते . स्थानिक कार्यवाह किरणराव डुघरेकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सूत्रसंचालन दीपाली भावसार , प्रास्ताविक रागिणी जकाते ,आभार विजय चौधरी यांनी मानले.संगीतमंच च्या विध्यार्थ्यांनी ' सदा विवेकानंदमयम् ' हे पद्य सादर केले.वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाचा  समारोप  करण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें