वालुर येथील पेट्रोल पंपावर चोरी; अज्ञात दोन चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 12 सितंबर 2018

वालुर येथील पेट्रोल पंपावर चोरी; अज्ञात दोन चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल.




सेलू : प्रतिनिधी शमशेर खान.

सेलू तालुक्यातील वालुर येथील सारीश फिलिंग स्टेशन वर अज्ञात दोन चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून पंपावरील कर्मचा-या कडून एका लाखावर रक्कम पळविल्याच्या घटनेने वालुर गावात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती याप्रमाणे  मंगळवार दि. ११  सप्टेंबर रोजी पहाटे दोन ते अडीच च्या सुमारास  चोरी झाल्याची घटना घडली. सेलू तालुक्यातील वालुर येथील वालुर-सेलू रस्त्यावरील  शैलेश सुरेंद्र तोषनीवाल यांच्या मालकीच्या असलेल्या   सारीश फिलिंग स्टेशन या पेट्रोल पंपावर आज पहाटे दोन ते अडीच या  सुमारास  पेट्रोल पंपवरील झोपलेल्या कर्मचा-यांना  चाकूचा धाक दाखवून बळजबरीने गल्ल्यातील एक लाख एक हजार रुपये व त्यांच्या जवळ असलेले 3 मोबाईल असे एकूण एक लाख 16 हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लांबविला. घडलेल्या घटनेची माहिती कर्मचारी यांनी पेट्रोल पंपाचे मालक तोष्णीवाल यांनी दिली. पोलीसांना घटने बाबत कळविण्यात आल्यावर सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  संदिपान शेळके आपल्या सहका-यासह घटनास्थळी दाखल झाले. परभणी हुन श्वान पथकहि माविण्यात आले.   या प्रकरणात परभणीचे साह्यक पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, सेलू येथील उप विभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे जिंतुरचे उप.विभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, यांनी घटनास्थळी भेट  दिली. पेट्रोल पंपाचे शैलेश सुरेंद्र तोष्णीवाल यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सेलू पोलीस ठाण्यात मालक अज्ञात दोन चोरट्यांच्या विरोधात भा.द.वि. कलम३९२, ४५७,३४ नुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें