हैदराबादहुन येणारा ४१ लाखाचा गुटखा पकडला. अप्पर पोलिस अधीक्षक पानसरे यांच्या पथकाची कारवाई. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 12 सितंबर 2018

हैदराबादहुन येणारा ४१ लाखाचा गुटखा पकडला. अप्पर पोलिस अधीक्षक पानसरे यांच्या पथकाची कारवाई.


सेलू  ता प्रतिनिधी शमशेर खान.
  सेलू तालुक्यातील वालूर
पंपावरील चोरीचा तपास काम
अटोपुन परत येत असतांना
हैद्राबादहून गुटखा घेऊन
येणाया आयशरवर कान्हड
परिसरात कारवाई करण्यात
आली. अप्पर पोलीस अधिक्षक
विश्व पानसरे यांच्या पथकाने
मंगळवार ११ सप्टेंबर रोजी
सकाळी ८ च्या सुमारास ही
कारवाई करुन ४१ लाख २५
हजार रुपयाचा गुटखा पकडला.
सेलू पोलीस ठाणे हद्दीतील
वालूर येथे मंगळवार ११
सप्टेंबरच्या मध्यरात्री पेट्रोल
पंपावर दरोडा पडला. याचा
तपास करण्यासाठी अप्पर
पोलीस अधिक्षक विश्व पानसरे,
सपोनि बी. पी. चोरमले
यांच्यासह कर्मचारी गेले होते.
वालूर येथुन बोरी मार्ग परत येत
असतांना गुप्त बातमीदाराकडुन
 मिळालेल्या माहितीवरून कान्हड
ते कौसडी दरम्यान सापळा रचुन
आयशर गाडी क्र. एमएच १९
झेड ५३७५ ही गाडी थांबवन
गाडी चालकास गाडी उघडून
दाखविण्यास सांगण्यात आले
सदर वाहनात गुटखा असल्याचे
निदर्शनास आले. या गाडीत
गोवा कंपनीच्या गुटख्याच्या ५०
गोन्या किंमत रुपये ४१ लाख
२५ हजार रुपयाचा माल
पकडण्यात आला. गाडी चालक
मुस्ताक नजिर शेख, जब्बार
शेख या दोघांना गाडीसह
पोलीस ठाण्यात हजर
करण्यात आले. ही कारवाई
अप्पर पोलिस अधिक्षक विश्व
पानसरे, सपोनि. बी.पी.
चोरमले, व्ही.एस. आलेवार,
पोहेकाँ. बालाजी रेडी, संजय
घुगे, गंगाधर पोते, दिनेश
स्वामी, परमेश्वर शिंदे यांच्या सह
पथकाने केली. कारवाई केली या कारवाईमुळे तालुक्यासह जिल्हाभरात एकच खळबळ उडाली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें