सार्वजनिक ग्रंथालयाच्या विविध प्रश्नासंदर्भात धरणे आंदोलन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 12 सितंबर 2018

सार्वजनिक ग्रंथालयाच्या विविध प्रश्नासंदर्भात धरणे आंदोलन.


सेलू प्रतिनिधी शमशेर खान

सेलू महाराष्र्ट राज्य ग्रंथालय संघ,जिल्हा ग्रंथालय संघ व सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी कृती समितीच्या वतिने बुधवारी (ता.१९) रोजी ग्रंथालय चळवळीच्या विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे अांदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव विलास शिंदे यांनी प्रसिद्धी प्रञकाद्वारे दिली अाहे.


गेल्या चार वर्षापासून सार्वजनिक ग्रंथालय चळवळीच्या वतिने राज्यातील ग्रंथालय चळवळीच्या विविध प्रश्नासंदर्भात अांदोलने, मोर्चा, निवेदने, धरणे या मार्गाने संबधित मंञी, राज्यमंञी, पालकमंञी, खासदार, अामदार,जिल्हाधिकारी,तहसिलदार यांच्यामार्फत पाठपुरावा केला.अशा विविध मार्गाने राज्याभर अांदोलने केली.परंतु या शासनाने ग्रंथालय चळवळीच्या संदर्भात कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही.सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचार्‍यांना किमान वेतनापेक्षाही कमी वेतन सध्या दिले जाते.त्यात जीवनमानानूसार व महागाई निर्देशांकानूसार वाढ करणे अपेक्षित अाहे.प्रमूख मागण्या पुढील प्रमाणे अाहेत.वाढती महागाई लक्षात घेता व काळाची गरज ओळखुन सार्वजनिक ग्रंथालयांना किमान तिप्पट परिरक्षण अनूदान वाढ देण्यात यावी.

सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचार्‍यांना सन २०१२ मधिल बाकी असलेली पन्नास टक्के अनूदान वाढ तत्काळ द्यावी.अाकृतीबंधानूसार कर्मचार्‍यांना वेतनश्रेणी,सेवाशर्ती व सेवानियम तत्काळ लागु करून वेतनश्रेणीनूसार वेतन निश्चिती करण्यात यावी.सर्व वर्गाच्या ग्रंथालयातील कर्मचार्‍यांना कामाचे तास शासकीय कामकाज नियमाप्रमाणे करण्यात यावेत. वर्ग बदल व नविन शासनमान्यता त्वरित सुरू करावी.राज्य ग्रंथालय परिषदेची अाणि जिल्हा ग्रंथालय समित्यांची पूनर्रचना करण्यात यावी.यासाठी (ता.१९) रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे अांदोलन करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंञी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार अाहे.हा सनदशीर अांदोलनाचा पहिला टप्पा असून जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयातील पदाधिकारी,कर्मचारी यांनी धरणे अांदोलनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे अावाहन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भास्करराव पिंपळकर, सचिव विलास शिंदे, कोषाध्यक्ष प्रा.दत्ता पवार, कृती समितीचे के.बी.शिंदे यांनी केले अाहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें