आराध्य गणेश मंडळाचे बक्षीस वितरण संपन्न.गणेश उत्सवा दरम्यान विविध स्पर्धा चे आयोजन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 24 सितंबर 2018

आराध्य गणेश मंडळाचे बक्षीस वितरण संपन्न.गणेश उत्सवा दरम्यान विविध स्पर्धा चे आयोजन.



सेलू प्रतिनिधी

सेलू ÷ दि 23 रविवार रोजी   शहरातील शिवाजी नगर भागातील  आराध्य गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या दरम्यान संगीत खुर्ची, गहू निवडणे , गाढवाला शेपूट लावणे, स्मरणशक्ती , डोळे मिटून दहीहंडी फोड अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते असे मंडळाचे अध्यक्ष हनुमान(हर्ष) टाके यांणी सांगीतले .

या स्पध्रेच्या विजेत्यांना गणेश विसर्जन ना प्रसंगी मान्यवर यांच्या उपस्थितीत शालेयसाहीत्य असलेले  बक्षीस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड व द्वितीय क्रमांक पारितोषिक अनिल टाके यांच्या वतीने देण्यात आले तसेच  वितरण करण्यात आले.

या स्पर्धा दोन गटात घेण्यात आली
लहान गट पहीली ते चौथी व मोठा गट पाचवी ते नव्वी ,

सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले

संगीत खुर्ची   हर्ष टाके , विक्रम टाके ,आराध्या टाके, गहू निवडणे अमोल साबळे , गाढवाला शेपूट लावणे पांडूरंग सुरवसे, स्मरणशक्ती वैभव जलकर दहीहंडी फोड रेणुका पडघण कृष्णा जगताप, वेदांत टाके यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल टाके, तर आभार रवि गुंजकर, तर यशस्वी करण्यासाठी रामेश्वर वाघमारे, आकाश काळबांडे,यशराज गायकवाड,   अनिल ढगे, विशाल गायकवाड, रूतीक डोळझापे, अभिजित गायकवाड , अर्जुन शिंदे, नागेश सरकते, युवराज शिंदे, कुणाल गडदे, ओमकार मसुरे शुभम काळे, अमोल साबळे, कृष्णा पवार, वैभव शिंदे, कृष्णा जगताप,  पांडूरग सूरवसे, वेदांत टाके ,विक्रम टाके, वैभव जवकर ,वेदांत जवकर आदींनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें