सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२४सप्टेंबर २०१८
येथील कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख व पत्रकार संतोष रणखांब यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालयास चां.भ.खैरमोडे लिखीत डाॅ.भिमराव रामजी आंबेडकर या चरित्रग्रंथाचे सहा खंड भेट दिले. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने संस्थाध्यक्ष परमेश्वर कदम, प्राचार्य डाॅ.वसंत सातपुते यांनी डाॅ.रणखांब यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर, पत्रकार गणेश पाटील, सय्यद आझम, ग्रंथालय परिचर संतुक कुलकर्णी, प्रा.गोविंद वाकणकर, प्रा.अजय भोसले, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थीनी आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सखाराम कदम यांनी केले तर आभार प्रा.गोविंद वाकणकर यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें