भाजप सरकारमुळे शेतकरी राजावर भीक मागण्याची वेळ -- आ.अब्दुल सत्तार ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 25 सितंबर 2018

भाजप सरकारमुळे शेतकरी राजावर भीक मागण्याची वेळ -- आ.अब्दुल सत्तार ;

एल्गार याञेने केली सोयगाव तालुक्यातील शासनाच्या कामांची पोलखोल;

सोयगाव (प्रतिनिधी)दि 25/09/2018.
कृषी प्रधान देश म्हणून आपली ओळख असलेल्या शेतकरी राजावरच भीक मागण्याची वेळ आली असुन नुसताच कागदांवर दुष्काळ जाहीर करुन चालेल का?
शेतक-यांची परिस्थिती कुपोषित बालकासारखी झाली असुन महात्मा गांधी यांचा विचार मनाशी बाळगून आता गावाकडे चला या संदेशाची पुनरावृत्ती देत
भाजप सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढीत एल्गार याञा परिवर्तन घडवून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे मत माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव - बनोटी......... येथे एल्गार याञेत हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांशी संवाद साधित अडी अडचणी जाणून घेतल्या. यावेळी आ.अब्दुल सत्तार बोलत होते.
एकेकाळी सुरत लुटून छञपती शिवाजी महाराजांनी शेतकरी राजांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम करीत शेतसारा माफ करण्याचे काम केले होते.परंतु या भाजप सरकारमधील राज्यकर्त्यांचा पाठिंबा मिळवित ललीत मोदीसारख्या अनेकांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करुन बाहेर देशांत पलायन केले असुन भाजप सरकार सामान्य नागरिकांची एकप्रकारे दिशाभूल करीत असुन विधवा - अपंग - निराधारांना वा-यावर सोडण्याचे काम करीत असल्याचे मत माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव - बनोटी येथे एल्गार याञेत हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांना माजीमंञी आ. अब्दुल सत्तार,माजी आ.कल्याणराव काळे,नितीन पाटील,नामदेवराव काळे,आदिंनी सखोल असे मार्गदर्शन करीत एल्गार याञेच्या माध्यमातून शेतकरी - शेतमजुर - नागरिकांच्या अडी अडचणी जाणून घेत संकटांना वाचा फोडण्यासाठी एल्गार याञेत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर आबा काळे,अक्षय काळे,जितसिंग करकोटक, रविंद्र काळे,दामुआण्णा गव्हाणे,.......यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

चौकट -- सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथे एल्गार याञेचे आगमन होताच अनेक गोरगरिब महिलांनी आ.अब्दुल सत्तार यांना आपल्या व्यथा मांडून विधवा - श्रावण बाळ आदि योजनांतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी विनंती केली.गोंदेगाव येथील नागरिकांनी बँक अधिकारी कर्ज प्रकरणे मंजूर करीत नसुन खुपच ञास देत असल्याची तक्रार उपस्थित करताच येथील बँकेस तसेच बनोटी येथील महावितरण कार्यालयास माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी शंभराहून अधिक नागरिकांसह भेट देऊन नागरिकांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी अधिका-यांना चांगलेच धारेवर धरुन विचारविनीमय करीत तात्काळ नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम केले.

** नोटाबंदीमध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार -- माजी आ. कल्याणराव काळे;
भ्रष्टाचारीच्या मुद्यावर भुलथापा देऊन सामान्य नागरिकांची दिशाभूल करीत सत्ता मिळविणा-यांनी नोटाबंदीसारखे निर्णय घेत सर्वात जास्त भ्रष्टाचार नोटाबंदीमध्ये केला असल्याचे मत व्यक्त करीत नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले आहे. घटना दुरुस्ती साठीही प्रयत्न सुरु असुन राफेल विमान खरेदी घोटाळा चांगलाच चव्हाट्यावर आला असून अनिल अंबानी यांना सदरील काॅन्ट्रक्ट देऊन चौकीदार म्हणणारेच भागीदार बनले असल्याचे मत व्यक्त करीत देशात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढतच असल्याचे मत माजी आ. कल्याणराव काळे यांनी व्यक्त केले. ****

**जातीयवादी पक्षाला थारा लागू देऊ नका -- जिल्हा शहराध्यक्ष नामदेवराव पवार;
--- भाजप सरकार शेतकरी विरोधी सरकार असुन व्यापारी - उद्योजकांच्या हिताचे निर्णय घेऊन जातीयवादाला खतपाणी घालण्याचेच काम करीत असुन गावांतर्गत आपापली भाऊबंदकी विसरुन खंबीरपणे काँग्रेस पक्षाच्या खंबीरपणे पाठिमागे उभे राहून जातीयवादी पक्षाला थारा लागू देऊ नका असे मत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.

एल्गार याञा - सामान्यांच्या हितासाठी .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें