खाऊसाठी जमविलेल्या पैशातून वर्गमित्रास शालेय गणवेश व साहित्य भेट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 25 सितंबर 2018

खाऊसाठी जमविलेल्या पैशातून वर्गमित्रास शालेय गणवेश व साहित्य भेट.

श्री महालिंगेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांचा आदर्श उपक्रम.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२४सप्टेंबर २०१८
येथील श्री महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मित्रत्वाचा आदर्श निर्माण करत त्यांच्या गरीब व होतकरु मित्र चि.विशाल रामधन भोसले यास वर्गातील सर्व मित्रांनी खाऊसाठी जमलेल्या पशातून शालेय गणवेश भेट दिला. वर्गशिक्षक नामदेव निळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. गणवेश वाटपा प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात इयत्ता आठवी (अ) चे विद्यार्थी चि.अक्षय गवारे, लक्ष्मण चव्हाण, पवण रोडे, नारायण चव्हाण, शिवाजी गडदे, सय्यद इम्रान, नितीन सहजराव, करण आरबाड, रोहण भोसले, करण भोसले, विजय जाधव, युवराज खरात, कैलाश बडे, तुकाराम सोनवणे, कु.मनिषा राठोड, पल्लवी राठोड, पायल राठोड, पल्लवी मोहिते, ललिता राठोड, पायल राठोड, पायल जाधव, सामका जाधव आदींसह वर्गशिक्षक नामदेव निळे व वर्गातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींची उपस्थिती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें