प्रतिनिधी.परभणी.अनवर पठान दि.25/09/2018.
परभणी येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालया कडून सन 2016/ 2017या कालावधीतील मजूर बांधकाम कागारांची विविध कल्याणकारी योजना ची पूर्ण कागदपत्राची पूर्तता करूनही अनुदानात विलंब होत असल्यामुळे तसेच निधीची उपलब्ध असूनही या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मनमानी व वेळकाढू धोरणामुळे व मनमानी पद्धतीने जाचक अटी लावल्यामुळे या वंचित बाधकाम कामगार मजुरांच्या न्याय हक्कासाठी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन MDO घटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 25 / 09 / 2018 रोजी *धरणे आंदोलन* करण्यात आले या धरणे आंदोलनात संघटनेच्यावतीने मा.निवासी उप जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना निवेदन देऊ या कार्यालयाच्या गलथान कारभार व विविध कल्याणकारी योजना च्या अनुदानात विलंब होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले याविषयी त्यांनी त्यांनी लवकरच संबंधित कार्यालयाच्या अधिकार्यांना बोलून त्याच्याशी चर्चा करून योग्य ते मार्ग करण्यात येईल असे आश्वासन दिले या धरणे आंदोलनात मा काॅ. किर्तीकुमार बुरांडे काॅ.सचिन देशपांडे या धरणे लाभार्थ्यांना विविध योजनां विषयी योग्य ते मार्गदर्शन केले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. तैसीम अहेमद खाॅन तथा जलील पटेल, स्वराज सिंह परीहार, विविध संघटनाचे व संस्थाचे शेख.शकील केजरीवाल, इस्माईल काँग्रेसचे आवेश बाबा शोक युनुस,यानी धरणे आंदोलन स्थळी भेट घेऊन या विषयी चर्चा केली या धरणे आंदोलनात शेख समशोद्दिन आखिल बेग, अब्दुल रशीद,स.रफीक, गुलाबबी तांबोळी मॅडम, अब्दुल खादर इनामदार , शेख इम्रान मोहम्मद अनेक चवीत लाभार्थ्यांची उपस्थिती होती यावेळी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र सचिव महेबूब खान पठाण ,जिल्हाध्यक्ष सय्यद रफीक पेडगावकर, उपाध्यक्ष उस्मान शेख चाँद भाई यांनीही आप आपले मनोगत व्यक्त केले . जर यानंतरही लाभार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर पुढे या कार्यालयाच्या विरोधात लाभार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी मोठा लढा देण्यात येईल असेही(MDO) संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें