भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन तालुक्यात माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक मेळावा संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत दानवे होते तर प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे संग्राम पाटील कोते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कदिर मौलाना म्हणून उपस्थिती होती.संग्राम पाटील यांनी खा.रावसाहेब पाटील दानवे यांच्यावर टीका केली की त्यांनी शेतकऱ्यांना साले म्हणून त्यांचा अपमान केला आहे व पोलिसांना सांगून कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करायला लावणे म्हणजे सत्तेचा माज चढने असा उल्लेख व खोट्या केसेस करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले भोकरदन /जाफराबाद तालुक्या दुष्काळ जाहीर करण्यात यावा,शेतकऱ्यांना ७/१२कोरा करून त्यांना नविन पीक कर्ज तातडीने मंजूर करावे आदि मागण्या होत्या.निवेदनावर रमेश सपकाळ, समाधान पाटील कळंबे,दीपक वाकडे,जुमान चाऊस,नंदकुमार गिरे, राजेश म्हस्के, बी.एन.कड,सुधाकर दानवे,फारुख कुरेशी,नसीम पठाण,कदिर बापू,अझहर शाह,इंद्र जैस्वाल, डॉ. जाधव,रईस भाई,फईम कादरी,मुजीब कादरी,सय्यद आरेफ,नईम कादरी,वामन दांडगे आदि कार्यकर्त्यांचे नावे आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें