सावळीविहीर प्रतिनिधी-कु.किरण जाधव.
शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व साईबाबा संस्थान कर्मचारी श्री प्रदीप त्रिभुवन यांच्या बायपास सर्जरीला २ वर्ष पूर्ण झाल्याने ,ते त्यांचा हा दिवस दरवर्षी आपला वाढदिवस समजून साईआश्रया अनाथालयातील विद्यार्थ्यांबरोबर संपूर्ण वेळ घालऊन साजरा करतात येथील लहान ,अनाथ व मतिमंद विद्यार्थी - विद्यार्थिनींना फळे व त्यांना दररोज उपयोगी असे टूथपेस्ट व वजनकाटा देऊन तेथील विद्यार्थ्यांचा एक नवा आनंद वाढदिवस साजरा करून द्विगुणित करून दिला .यावेळी साईआश्रया परिवाराचे अध्यक्ष- श्री.गणेश एन दळवी ,व शिक्षक - संतोष आर लोणारे ,तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.प्रमिला प्रदीप त्रिभुवन त्यांचे दोन्ही जावई - प्रा.श्री .श्रीप्रसाद व सौ .मैत्रीही कदम ,व प्रा .श्री रावसाहेब व सौ.प्रियंका मोकळ ,व त्यांचा मित्रपरिवार श्री रामनाथ शिंदे ,श्री .नंदकिशोर जमदाडे ,हे उपस्थित होते .व या कार्यक्रमासाठी साईआश्रया परिवारातील सदस्य उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें