गुणवत्ता वाढीसाठी नियोजन महत्त्वाचे-जयंत गाढे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 25 सितंबर 2018

गुणवत्ता वाढीसाठी नियोजन महत्त्वाचे-जयंत गाढे.


सेलू प्रतिनिधि
शाळा विकासामध्ये भौतिक सुविधे बरोबरच विद्यार्थी गुणवत्ता महत्त्वाची आहे आणि  विद्यार्थी गुणवत्ता वाढवायची असेल तर मुल निहाय विषय निहाय नियोजन महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी जयंत गाढे यांनी केले. 24 सप्टेंबर रोजी गटसाधन केंद्र सेलू येथे तालुक्यातील सीआरजी सदस्यांची कार्यशाळा घेण्यात आली. तालुक्यातील विद्यार्थांचा अध्ययन स्तर उंचावण्यासाठी शिक्षण परिषदेमध्ये घ्यावयाच्या विषयवार घटकांचे यावेळी सादरीकरण घेण्यात आले. सुमिता सबणिस यांनी विद्यार्थी कृती आराखडा कसा तयार करावा याबद्दल मार्गदर्शन केले.कृष्णा पुरणाळे यांनी गणित पेटीतील साहित्याद्वारे विविध गणिती क्रिया सुलभपध्दतीने करून घेतल्या तर शिवकुमार औसेकर यांनी विज्ञान विषयाचे प्रयोगाद्वारे अध्यापन केले.इंग्रजी विषयाचे अशोक कुंभार व किरण गिल्डा यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुणवत्ता कक्षेच्या सुनिता काळे यांनी केले तर सुत्रसंचालन शरद ठाकर यांनी केले.कार्यशाळेसाठी   सर्व केंद्र प्रमुख बीआरजी,सीआरजी सदस्य व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें