सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२८सप्टेंबर २०१८
आज सोनपेठ शहरातील दोन संघटनांच्या बंदच्या आवाहना नुसार व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन त्यास प्रतिसाद दिला.
व्यापारी महासंघ सोनपेठ यांनी भारत सरकारच्या मोठ्या कंपन्यांना बाजारपेठेत गुंतवणूक करण्यास परवानगी परवानगी दिल्याने स्थानिक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना धंदे बंद करायची वेळ आली आहे व्यापारी या निर्णयामुळे बेकारीच्या मार्गावर आहेत या निर्णयास निर्णयास विरोध करण्यासाठी येथील व्यापारी महासंघा च्यावतीने बंद पुकारला होता तर केंद्र सरकारने नुकतीच ऑनलाइन फार्मसीचे धोरण जाहीर केल्याने ग्रहकांना आैषधी घरबसल्या उपलब्ध होत आहेत. यामुळे ग्राहकांची सुविधा होत असली तरी, यामध्ये प्रामुख्याने नशेली व मादक घटकांची आैषधी सर्ररास विक्री व उपलब्ध होत आहेत. याचे गंभीर परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. मादक घटकांची काही ठरावीक आैषधी वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांच्या चिठ्ठी शिवाय औषध विक्रेता ग्राहकांना देत नसतात; मात्र हीच औषधे ऑनलाइन पध्दतीने सहज उपलब्ध होत आहेत. यामुळे त्याचे परिणाम औषधी सेवन करणाऱ्यासह त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनाही सोसावे लागत आहेत. शासनाने घेतलेल्या या निर्णया विरोधात आज औषध विक्रेत्यांनी देशव्यापी बंद पुकारला होता. सोनपेठ येथील औषध विक्रेत्यांनीही यात सहभागी होऊन शहरातील सर्व औषधी दुकाने बंद ठेऊन केंद्र शासनाच्य ऑनलाइन फार्मसी विरोधात निषेध व्यक्त केला. त्यामुळे आज सकाळपासून शहरातील सर्व औषधी दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
याबाबत तहसील कार्यालयावर मुक मोर्चातुन तहसीलदार जीवराज डापकर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी सोनपेठ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो. चे तालुकाध्यक्ष संतोष निर्मळे सुरेश लोढा, लहुकुमार वाकणकर, आनंद गुजराथी, मुन्ना लोहगावकर, राजेश लव्हाळे, महेश शर्मा, श्रीकांत जोशी, मयुर पैंजणे, गणेश मुंडे, परमेश्वर राठोड, मोहन खोडवे आदींची उपस्थिती होती तर व्यापारी महासंघा च्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनावर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा कुसुमकर सतीश मुळे आणि संतोष निर्मळे यांच्या स्वाक्षर्या आहेत. यावेळी संघटनेतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें